
चास (जि. पुणे) ः खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील चिखलगाव येथे सुसज्ज अशा शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीचे (Government Ashram School Building) काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या इमारतीचे काम पूर्ण होऊन, पश्चिम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा (Tribal Student Education) व निवासाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे, अशी माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली. नुकतीच त्यांनी आश्रमशाळेच्या कामाची पाहणी करून वेगाने काम करून लवकर वापर सुरू करण्याच्या सूचना केल्या.
आमदार मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे चिखलगाव येथे सुमारे तीन एकरच्या भव्य परिसरात सहा कोटी सत्तर लाख रुपयांची शासकीय आश्रमशाळेची भव्य इमारत उभी रहात आहे. या आश्रमशाळेमध्ये २७६ विद्यार्थी शिक्षण घेत असून मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्न आमदारांनी मार्गी लागला आहे. तर नवीन चार मजली वसतिगृहासाठी १४ कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले असून वसतिगृह आणि शालेय इमारतीचे काम मार्गी लागणार आहे. या अद्ययावत आश्रमशाळेमुळे गैरसोय बंद होणार आहे.
इमारतीसाठी चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे यांनी प्रयत्न केले होते. गेल्या दहा वर्षांपासून शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागत असून घोडेगाव आदिवासी प्रकल्पातील २५ शाळांमध्ये चिखलगाव आश्रमशाळेतील तीन मुली प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. भविष्यामध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चिखलगाव आश्रमशाळा ही एक वरदान ठरणार आहे.
या आश्रमशाळेच्या कामाची पाहणी करताना आमदार मोहिते यांच्यासमवेत जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, आश्रमशाळेच्या विद्यार्थिनी, सरपंच हेमलता गोपाळे, माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण मुके, अॅड. अरुण मुळूक, सुजाता पचपिंड यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.