SRT Technology : ‘एसआरटी’ तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील

Eknath Shinde : ‘‘मी सुद्धा शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असे हे कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले ‘एसआरटी’ तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील नेरळ येथे दिली.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon

Raigad News : ‘‘मी सुद्धा शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असे हे कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले ‘एसआरटी’ तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील नेरळ येथे दिली.

‘एसआरटी’ शेतकरी कृषी सन्मान सोहळा २०२३ चे आयोजन कर्जत तालुक्यातील नेरळ येथील सगुणा बाग येथे सोमवारी (ता. २२) आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते.

Eknath Shinde
SRT Technology : इतर पिकांतही विस्तारतेय ‘एसआरटी’ तंत्र आधारित शेती

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की प्रगती, समृद्धी आणि विकासाची गंगा घराघरांमध्ये पोहोचविण्याची आवश्यकता आहे, त्यासाठीची प्रेरणा अशा मेळाव्यातून मिळते. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार शेतीतील बदलांना स्वीकारणे, त्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे.

Eknath Shinde
SRT Technology : भाताशिवाय अन्य पिकांतही वापरले ‘एसआरटी’ तंत्र

सर्व समस्यांतून बळीराजाला पुढे न्यायचे आहे. यासाठी शाश्‍वत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, असे सांगून ते म्हणाले, की शासनामार्फत हिंगोली येथे स्व. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र सुरू करीत आहोत.

आंबा प्रक्रिया उद्योग, काजू विकास महामंडळ, कांदा प्रक्रिया, असे विविध शेतीपूरक उपक्रम राबविले जात आहेत. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे पुन्हा सुरू केली आहे. त्याचा लाभ संपूर्ण राज्यभर निश्‍चितच मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे.

कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते भूमातेच्या चित्राचे अनावरण करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. प्रास्ताविक सगुणा बागचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन निवेदक दीपाली केळकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने एसआरटी तंत्रज्ञानाविषयीचा माहितीपट दाखविण्यात आला. या वेळी शेती संशोधन या विषयात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही संशोधक व शेतकऱ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उत्तमरित्या राबविणारे कृषी शास्त्रज्ञ विजय कोळेकर, कृषी तंत्रज्ञानाचे नवनवीन प्रयोग करणारे श्री. निवळकर यांचा समावेश होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com