शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

नांदेड जिल्ह्यात दोन महिन्यांतच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन नदीकाठची जमीन खरडून गेली आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

नांदेड : नांदेड जिल्ह्यात दोन महिन्यांतच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे खरिपातील पिकांचे (Kharif Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन नदीकाठची जमीन खरडून (Agriculture Land Damage) गेली आहे. अशात राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या (Drought Affected Farmer) तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली.

शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
Crop Damage : पिकातील अतिरीक्त पाणी बाहेर कसे काढाल?

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री. दानवे शुक्रवारी (ता. १२) नांदेडमध्ये आले होते. निळा, नांदुसा, पिंपळगाव (महादेव) येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, विधानसभा संघटक रेणुकादास वैद्य, संपर्कप्रमुख धोंडू पाटील, माजी आमदार रोहिदास चव्हाण, बाळासाहेब देशमुख, बाबासाहेब निळेकर, नवनाथ जोगदंड, सुनील कदम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना दानवे म्हणाले, की शासनाने एनडीआरएफ निकषानुसार भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. मात्र या नियमात सर्व शेतकरी बसणार नाहीत. शासनाने शेतकऱ्यांना एनडीआरएचच्या कागदाच्या कचाट्यात न अडकवता सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरसकट मदत करावी. अन्यथा, शेतकरी सरकार विरोधात हातात रुमने घेऊन उभे राहतील असा इशारा त्यांनी दिला. सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सभागृहात आवाज उठवेल, असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com