Rbi Dividend : RBI कडून सरकारला मिळणाऱ्या लाभांशात ३ पट वाढ ; ८७ हजार ४१६ कोटी रुपये तिजोरीत येणार

RBI Board Meet : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मोदी सरकारला लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
RBI Board Meet
RBI Board Meetagrowon

Rbi Dividend To Government : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारला ८७ हजार ४१६ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आहे. RBI ने कंटिजेंसी रिस्क फंड ६ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेला अतिरिक्त निधी हा ४८ हजार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकापेक्षा कितीतरी जास्त आहे.

RBI Board Meet
RBI Repo Rate : रेपो रेट 'जैसे थे' ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय

२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम जवळपास तिप्पट आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये, रिझर्व्ह बँकेने सरकारला ३० हजार ३०७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जारी केला होता, तर अर्थसंकल्पीय अंदाज ७३ हजार ९४८ कोटी रुपये होता.

RBI बोर्डाच्या बैठकीत जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक आव्हानांवरही चर्चा झाली. रिझर्व्ह बँकेने संपूर्ण आर्थिक वर्षात कोणती कामे केली आणि मध्यवर्ती बँकेचा वार्षिक खाते अहवालही मंजूर करण्यात आला. आकस्मिकता निधी ५.५ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com