Dhananajay Munde : शेतकरी नष्ट करण्याचे सरकारचे धोरण ः मुंडे

कांद्याला मिळणारा अत्यल्प दर बघता कांदा उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत सापडला आहे. शेतकरी सुखी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. शेतकरी एकजूट व आंदोलनामुळे शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले.
Dhananjay Munde
Dhananjay MundeAgrowon

ओतूर, जि. पुणे ः ‘‘कांद्याला मिळणारा अत्यल्प दर (Onion Rate) बघता कांदा उत्पादक (Onion Producer Farmer) शेतकरी अतिशय अडचणीत सापडला आहे. शेतकरी सुखी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. शेतकरी एकजूट व आंदोलनामुळे (Farmer Protest) शेतकरीविरोधी कायदे (Farm Laws) केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. शेवटी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले, एवढी ताकद शेतकरी एकजुटीत आहे. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून, शेतकऱ्यांना नष्ट करण्याचे धोरण राबवीत आहे,’’ अशी टीका माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली.

Dhananjay Munde
Agriculture Export Ban : दुर्दैवी निर्यातबंदी

ओतूर (ता. जुन्नर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि जुन्नर तालुका शेतकरी संघटना यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ट्रॅक्टरवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आयोजित सभेत मुंडे बोलत होते. या वेळी आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे माजी सभापती ॲड. संजय काळे, शेतकरी नेते तान्हाजी बेनके, अंबादास हांडे, लक्ष्मण शिंदे, संजय भुजबळ, प्रमोद खांडगे, जुन्नर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अंकुश आमले, मोहित ढमाले, बबन तांबे आदी उपस्थित होते.

बेनके म्हणाले, ‘‘कांदा दरवाढीबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतली. त्यांनी राज्य सरकारने याबाबत कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचे सांगितले. निर्यातीवरील कर कमी करण्यासाठी प्रस्ताव पाठवायला हवा.’’

शेतीत लागणाऱ्या खते व औषधांच्या किमती वाढल्या, मजुरी वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च तिप्पट झाला आहे. दर मात्र नीचांकी आहे. परंतु सरकारला या बाबत काही पडले नाही. सत्तांतरनाट्य झाले, मंत्रिमंडळ स्थापन झाले. पालकमंत्र्यांच्या निवडी होतील, पण शेतकरी व जनतेच्या समस्या सोडविणार कधी?’
धनंजय मुंडे, माजी मंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com