Zilla Parishad : जि.प. स्थगिती उठविलेल्या ७९ कोटींची कामे रद्द?

जिल्हा परिषदेने ११८ कोटींच्या स्थगिती असलेल्या कामांपैकी ३९ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठविल्यानंतर उर्वरित ७९ कोटींच्या कामांवरील स्थगिती पालकमंत्री दादा भुसे यांच्या मान्यतेनंतर उठविण्यात आली.
Zilla Parishad
Zilla ParishadAgrowon

नाशिक : जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) ११८ कोटींच्या स्थगिती असलेल्या कामांपैकी ३९ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठविल्यानंतर उर्वरित ७९ कोटींच्या कामांवरील स्थगिती पालकमंत्री दादा भुसे यांच्या मान्यतेनंतर उठविण्यात आली.

Zilla Parishad
ZP Election : निवडणूक तहकूब ठेवण्याचा अधिकार आहे?

मात्र, सदर ७९ कोटींची कामे रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. या कामांना केवळ प्रशासकीय मान्यता दिल्या असून निविदा प्रक्रिया राबविलेली नाही. या निधीतील कामे रद्द करून नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत पालकमंत्र्यांच्या नावाने चाचपणी केली जात आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलै महिन्यात जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२३ या वर्षात प्राप्त झालेल्या नियतव्ययातील नियोजनास स्थगिती दिली होती. त्यानंतर एक एप्रिल २०२१ नंतर मंजूर झालेल्या व कार्यारंभ आदेश न दिलेल्या कामांनाही स्थगिती देण्याचा निर्णय १९ जुलैस राज्य सरकारने घेतला होता.

पालकमंत्री नियुक्तीनंतर ही स्थगिती उठविण्याची मागणी लोकप्रतिनिधी केली. अखेरीस नोव्हेंबरच्या मध्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर केलेल्या जिल्हा परिषदेच्या ११८ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेस कळवीत पत्र दिले. या ११८ कोटींच्या कामांमध्ये साधारणपणे ७९ कोटींच्या कामांना केवळ प्रशासकीय मान्यता दिलेल्या असून उर्वरित ३९ कोटींची कामे निविदा पातळीवर आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com