Weather Update : किमान तापमानात हळूहळू घट शक्य

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वादळी प्रणालींमुळे राज्यात झालेले ढगाळ वातावरण निवळू लागले आहे. उन्हाचा चटका वाढत असून, उकाडा कायम आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वादळी प्रणालींमुळे राज्यात झालेले ढगाळ वातावरण (Cloudy Weather) निवळू लागले आहे. उन्हाचा चटका (Heat) वाढत असून, उकाडा कायम आहे. आज (ता. १७) कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Weather Update
Weather Update : पावसानं वाढवली चिंता !

राज्याच्या तापमानाचा वाढ झाली असतानाच, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राजस्थानामधील चूरू येथे शुक्रवारी (ता. १६) देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील सर्वांत निचांकी १.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आजपासून (ता. १७) राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पारा घसरण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी (ता. १६) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी १६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २५ अंशांच्या दरम्यान होते. सोलापूरात देशातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Weather Update : ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार कायम राहणार

अरबी समुद्रातील वादळी प्रणाली ओसणार

पूर्व-मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन)किनाऱ्यापासून दूर जात आहे. आज (ता.१७) सायंकाळपर्यंत या प्रणालीची तीव्रता ओसरणार आहे. यातच आग्नेय बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१६.५), जळगाव - (१९.०), धुळे ३१.० (१५.८), कोल्हापूर ३०.५ (१९.०), महाबळेश्वर २७.३(१५.९), नाशिक २८.८ (१७.९), निफाड २९.८ (१६.०), सांगली ३२.३ (१८.३), सातारा ३१.३(१७.४), सोलापूर ३५.० (१९.५), सांताक्रूझ ३४.९(२३.०), डहाणू ३१.६ (२२.६), रत्नागिरी ३४.० (२२.०), औरंगाबाद २९.४ (१६.०), नांदेड - (२०.४), परभणी ३१.४ (१९.२), अकोला ३२.३ (२१.०), अमरावती ३२.२ (१९.५), बुलढाणा २८.४ (१८.६), ब्रह्मपूरी ३४.० (१९.४), चंद्रपूर ३०.८ (१९.६), गडचिरोली ३१.२(१६.८), गोंदिया ३१.०(१९.२), नागपूर ३०.८ (१८.९), वर्धा ३१.२(१९.८), यवतमाळ ३२.७ (१९.०).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com