MLA Election : पदवीधर निवडणूक निकालाची उत्सुकता

पदवीधर मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील हे तिसऱ्यांदा रिंगणात होते. तर महाविकास आघाडीचे काँग्रेसने धीरज लिंगाडे यांना ऐनवेळी संधी दिली.
MLA Election
MLA ElectionAgrowon

अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला मतदान प्रक्रिया (Voting Possess) पूर्ण झाली. आता गुरुवारी (ता. २) लागणाऱ्या निकालाकडे (Election Result) सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

विभागातील पाचही जिल्ह्यांत ४९.६७ टक्के मतदान झाले. तब्बल ५० टक्के मतदारांनी मतदान न केल्याने एवढ्या कमी आकडेवारीत आत कोण जिंकून येईल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

या निवडणुकीत भाजप (BJP) व महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) रिंगणात चांगली लढत दिल्याने निवडणुकीचा निकाल धक्कादायक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पदवीधर मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील हे तिसऱ्यांदा रिंगणात होते. तर महाविकास आघाडीचे काँग्रेसने धीरज लिंगाडे यांना ऐनवेळी संधी दिली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अमलकार यांच्यासह तब्बल २३ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत प्रामुख्याने बेरोजगारी, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, जुनी पेन्शन योजना हे मुद्दे शेवटपर्यंत चर्चेत राहिले.

याचा फटका डॉ. पाटील यांना बसतो की त्यांनी उभे केलेले नेटवर्क त्यांना तारून नेते हे गुरुवारी स्पष्ट होईल.

धीरज लिंगाडे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने प्रचारासाठी तितकासा वेळ मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे त्यांच्या विजयाचे गणित खरे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किती प्रमाणात काम केले, मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी राहिले, यावरच बहुतांश प्रमाणात अवलंबून आहे.

MLA Election
Nashik MLC Election : ‘नाशिक पदवीधर’साठी नगर जिल्ह्यात जास्त मतदार

या निवडणुकीत पाचही जिल्ह्यातील उमेदवार रिंगणात होते. त्यांना स्व जिल्ह्यात सहानुभूती मिळाली. मतदान सुरू झाले तेव्हा दुपारपर्यंत फारशी गर्दी दिसत नव्हती.

मतदानाचा टक्का दुपारनंतर चार पर्यंत वाढला. तरीही सुमारे ५० टक्के पदवीधरांनी मतदान न केल्याने त्यांची नाराजी स्पष्ट दिसून आली.

उद्या निकाल

शिक्षक पदवीधर निवडणुकीचा निकाल गुरुवारी (ता. २) लागणार आहे. मतमोजणी मतांच्या पसंतीचा कोटा ठरवणार आहे. पहिल्या पंसतीमध्ये कोणताही उमेदवार कोटा पूर्ण करू शकला नाही, तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील.

झालेले मतदान पाहता काट्याची टक्कर दिसून येते. विजयासाठी दुसऱ्या, तिसऱ्या पंसतीपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हानिहाय झालेले मतदान

यवतमाळ - ५८.८७ टक्के

वाशीम - ५४.३० टक्के

बुलडाणा - ५३.०४ टक्के

अमरावती - ४३.३७ टक्के

अकोला - ४६.९१ टक्के

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com