Grain Procurement : शेतकरी उत्पादक कंपन्यांचे धान्य खरेदी केंद्र सुरु

‘ग्रामहित’ने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीने शेतमालाच्या प्रतवारीनुसार म्हणजेच त्यांत असलेले ओलावा, काडी कचरा याचे प्रमाण शेतीमालाच्या प्रतवारीनुसार भाव दिला जाणार आहे.
Grain Procurement
Grain ProcurementAgrowon

परभणी ः शेतीमाल विपणन व्यवस्थेतील भारतीय स्टार्टअप (Indian Startup) यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामहित प्राइवेट लिमिटेड (Gramhit FPC) आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे यंदा (२०२२) परभणी जिल्ह्यातील ५ शेतकरी उत्पादक कंपन्यांतर्फे धान्य खरेदी (Grain Procurement) व तारण केंद्र सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या सूत्रांनी दिली.

Grain Procurement
Free Grain : पनवेलमधील गरिबांसाठी धान्याचे कोठार खुले

वर्णा (ता. जिंतूर) येथील वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, सारंगापूर (ता. मानवत) येथील प्राकृत शेतकरी उत्पादक कंपनी, सेलू येथील कृषक शेतकरी उत्पादक कंपनी, परळगव्हाण (ता. पाथरी) येथील सर्वोदय शेतकरी उत्पादक कंपनी, धारासूर (ता. गंगाखेड) येथील धारासूर शेतकरी उत्पादक कंपनी या पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत शेतीमाल खरेदी व तारण केंद्र सुरु केले आहे.

Grain Procurement
Paddy Bonus : भाताला ३७५ रुपये बोनस

जिल्हाधिकारी तथा आत्माच्या नियामक मंडलाच्या अध्यक्ष आंचल गोयल यांच्या हस्ते सारंगपूर येथील शेतकरी कंपनीच्या धान्य खरेदी व तारण केंद्राचे उद्घघाटन रामपुरी (ता. मानवत) येथे करण्यात आले.

यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक व्ही. डी. लोखंडे, ग्रामहितचे संचालक पंकज महल्ले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आर. टी. इक्कर, वाय. एस. पवार, अभिजित देशमुख, कंपनीचे संचालक कृष्णा गव्हाणेपस्थित होते.

‘ग्रामहित’ने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीने शेतमालाच्या प्रतवारीनुसार म्हणजेच त्यांत असलेले ओलावा, काडी कचरा याचे प्रमाण शेतीमालाच्या प्रतवारीनुसार भाव दिला जाणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com