Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात

जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २८ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon

नांदेड ः जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election) २८ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या ग्रामपंचायतींसाठी ता.१८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी इच्छुक ता.२८ नोव्हेंबर ते ता.दोन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरून त्याची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावी लागणार आहे. थेट सरपंच निवडीमुळे मतदारांमध्ये निवडणुकीचा उत्साह अधिक आहे. राज्य निवडणूक आयोगाने आॅक्टोबर २०२२ ते डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ता.नऊ नोव्हेंबर रोजी जाहीर केला.

त्यानुषंगाने जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, उमरी, बिलोली, नायगाव, मुखेड, कंधार, लोहा आणि देगलूर या तालुक्यांतील १८१ ग्रामपंचायतींसाठी ता.१८ डिसेंबर रोजी मतदान तर ता.२० डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने उमेदवार व मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. गावागावात पुढाऱ्यांनी पॅनल उभे केले असून, जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाची उमेदवारी देवू केली आहे.

त्यानुषंगाने मतदारांची जुळवाजुळव केल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुका व जिल्हा स्तरावरील नेत्यांनी देखील गावाच्या राजकारणात लक्ष घातले असून ऐन हिवाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२८ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर - अर्ज दाखल करण्याची मुदत

पाच डिसेंबर - अर्ज छाननी

सात डिसेंबर - अर्ज मागे घेण्याचा दिनांक, निवडणूक चिन्ह वाटप

१८ डिसेंबर - मतदान

२० डिसेंबर - मतमोजणी

२३ डिसेंबर - निकालाची अधिसूचना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com