
माळीनगर : माळशिरस तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील (Gram Panchayat Election) सरपंचपदासाठी (Nomination For Sarpanch) १९८ तर सदस्यांसाठी विक्रमी एक हजार ३०२ अर्ज दाखल झाले आहेत,अशी माहिती तहसीलदार जगदीश निंबाळकर व निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी दिली.
शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.त्याचदिवशी सरपंचपदासाठी सर्वाधिक ११६ तर सदस्यांसाठी ८३९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.वेळापूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी सर्वात जास्त ११ तर सदस्यांसाठी ९० अर्ज दाखल झाले आहेत.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत बुधवारपर्यंत आहे.त्यानंतरच सरपंच व सदस्यांसाठी किती उमेदवार निवडणूक आखाड्यात राहतात व बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दाखल अर्जांचा तपशील
कंसाच्या बाहेरचे आकडे हे सरपंचपदासाठी दाखल अर्जांचे तर कंसातील आकडे सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जांचे : कोळेगाव: ४ (३१), फळवणी: ४ (४४), काळमवाडी: ३ (३८), तिरवंडी: १० (५१), कचरेवाडी: ४ (२५), मारकडवाडी: ५ (३४), निमगाव: ५ (४७), मेडद: ५ (५६), उंबरे दहिगाव : ४ (४५), पिसेवाडी : ६ (३८),तामशिदवाडी : ५ (१४),पानीव : ५ (४१),
आनंदनगर : ७ (३५),बागेचीवाडी : ६ (२२),चांदापुरी: ६ (३०), पठाणवस्ती :४ (२५), इस्लामपूर : ७ (४१), यशवंतनगर : ४ (५२), संगम : ६ (२४),चौंडेश्वरवाडी : ५ (५३), खंडाळी दत्तनगर : ६ (५४), धानोरे : ७ (३९), उघडेवाडी : २ (१९), माळेवाडी (बो): ९ (३२), नेवरे : ८ (२६), जांबुड : ५ (४६), लोंढे- मोहितेवाडी: ८ (१४), सदाशिवनगर : १० (४४), पुरंदावडे: ९ (४३), पळसमंडळ: १ (२७), तांबेवाडी : २ (९), गुरसाळे : ५ (३५), तरंगफळ : ८ (४८), मोटेवाडी (मा): ७ (२४),वेळापूर : ११ (९०).
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.