River Conservation : ग्रामपंचायतींनी कचरा गोळा करण्याची मोहीम राबवावी

‘चला जाणूया नदीला’ हे अभियान जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. नद्या स्वच्छ, समृध्द करण्यासाठी नदीला आधी समजून घेणे आवश्यक आहे.
Grampanchyat News
Grampanchyat NewsAgrowon

वर्धा : ‘‘जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आपले गाव व परिसरातील कचरा गोळा करण्याची मोहीम (Garbage campaign) व्यापक प्रमाणावर लोकसहभागातून राबवावी. मुलांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे, यासाठी त्यांचा सुद्धा यात सहभाग घ्यावा,’’ असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Collector Rahul Kardile) यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत धाम नदी काठावरील सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपवनसंरक्षक राकेश सेपट, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, धाम नदी समन्वयक मुरलीधर बेलखोडे आदी उपस्थित होते.

‘चला जाणूया नदीला’ हे अभियान जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. नद्या स्वच्छ, समृध्द करण्यासाठी नदीला आधी समजून घेणे आवश्यक आहे.

त्याशिवाय नदीच्या स्वच्छतेची मोहीम राबविता येणार नाही. यासाठीच ‘नदी संवाद’ अभियान राबविले जात आहे. गावातील वातावरण स्वच्छ, सुंदर करण्यासाठी ग्रामपंचायतींनी कचरा गोळ्या करण्याची मोहीम राबवावी.’’

घुगे म्हणाले, ‘‘मानवी हस्तक्षेपामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यांना पुन्हा नैसर्गिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावांचे आराखडे तयार करताना नद्यांच्या पुनर्जिवनाचा त्यात प्रामुख्याने समावेश करावा.’’

Grampanchyat News
कृषी कचरा शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग

जल, पर्यावरण व सांडपाणी व्यवस्थापन तज्ज्ञ सायली जोशी, सतीश खाडे, संजय कांबळे यांनी कार्यशाळेला दुरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित ४४ गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांच्या प्रश्नांचे समाधान देखील मार्गदर्शकांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले यांनी प्रास्ताविक केले. खोब्रागडे यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com