Rabi Seeds : नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात रब्बी बियाणे उपलब्ध

हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, जवस, गहू बियाणे मिळणार
Rabi Seeds
Rabi SeedsAgrowon

नांदेड : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे (VNMKV) प्रसारित तसेच निर्मित रब्बी हंगामातील (Rabi Season) प्रमुख पिकांचे बियाणे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये (Cotton Research Center) विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, जवस, गहू या पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे.

मागील चार वर्षांपासून कृषी विद्यापीठाद्वारे निर्मित बियाणे नांदेड शहरातील कापूस संशोधन केंद्रामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, जवस, गहू या पिकांच्या बियाणांचा समावेश आहे. यापैकी हरभरा पिकाचा बीडीएनजी ७९७ (आकाश) हा पिवळसर लाल रंगाचा, तर बीडीएनजीके ७९८ हा मध्यम आकाराच्या दाण्याचा काबुली वाण आहे.

Rabi Seeds
Rabi Season : आता भिस्त रब्बीवर...

करडईचा पीबीएनएस १२ (परभणी कुसुम) व पीबीएनएस ८६ (पुर्णा) हे कोरडवाहू तसेच बागायती लागवडीस योग्य असणारे, मावा कीड आणि मर रोगास कमी बळी पडणारे वाण आहेत. जवस पिकाचा एलएसएल ९३ हा कमी कालावधीत (९०-९५ दिवस) तयार होणारा असल्यामुळे कोरडवाहू लागवडीस योग्य व अधिक उत्पादनक्षम वाण आहे.

त्र्यंबक व समाधान हे गव्हाचे वाण अधिक उत्पादनक्षम व तांबेरा रोगास कमी बळी पडतात. हे बियाणे नांदेड शहरातील देगलूर नाका भागामध्ये असणाऱ्या कापूस संशोधन केंद्रामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

हरभरा बीडीएनजी ७९७ (आकाश) व बीडीएनजीके ७९८

करडई पीबीएनएस १२ व पीबीएनएस ८६

रब्बी ज्वारी परभणी मोती

जवस एलएसएल ९३

गहू

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com