Chana Sowing : एक लाख हेक्टरवर हरभरा

यंदा दोन जिल्ह्यांतील लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यातील आतापर्यंत एक लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झालेली आहे.
Chana Sowing
Chana Sowing Agrowon

यवतमाळ : यंदा दोन जिल्ह्यांतील लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी (Chana Sowing) होण्याचा अंदाज आहे. त्यातील आतापर्यंत एक लाख हेक्टरवर हरभरा पेरणी (Chana Cultivation) झालेली आहे. गव्हाच्या पेरणीला सुरुवात झालेली असून, जवळपास पाच हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी (Wheat Sowing) झालेली आहे. येत्या काही दिवसांत शंभर टक्के पेरणी होण्याचा अंदाज आहे.

Chana Sowing
Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा खरंच वाढला का?

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी हंगामावार आहे. खरीप हंगामातील खर्च रब्बीत भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्यामुळेच रब्बी हंगामात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होईल, असा अंदाज आहे.

Chana Sowing
Chana Rate : मका स्थिर; हरभऱ्याच्या किमतींत वाढ

कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन केले असून, दोन लाख सहा हजार ७१० हेक्टरवर रब्बी हंगामाची लागवड होण्याचा अंदाज आहे. त्यात हरभरा एक लाख ४५ हजार हेक्टरवर, गहू ४५ हजार, ज्वारीची दोन हजार ५०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.

Chana Sowing
Chana Sowing : शेतकरी नियोजन पीक : हरभरा

सार्वजनिक व खासगी असे मिळून ७५ हजार ९८० क्विंटल हरभऱ्याचे बियाणे, गव्हाचे ४६ हजार ५४३ क्विंटल असे सर्व मिळून एक लाख २२ हजार ९९७ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. बियाणे उपलब्ध झाले असून, पेरणीला वेग आलेला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झालेली असून, पाच हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक असून, नियोजित हेक्टरपैकी ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. येत्या काही दिवसांत पेरणी पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. गव्हाच्या पेरणीला वेग आलेला आहे.

बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध

रब्बी हंगामात पेरा वाढणार असल्याने महाबीजने यंदा लवकरच बियाणे कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचविले आहे. इतर कंपन्यांचे बियाणेही गावागावांत पोहोचले आहे. आतापर्यंत जवळपास ५० टक्के पेरणी आटोपली आहे. मुबलक बियाणे असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शंभर टक्के पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com