
नांदेड : यंदा पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे जिल्ह्यात रब्बी पेरणीला (Rabi Sowing) वेग आला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात सव्वातील लाख हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. यात तब्बल अडीच लाख हेक्टरवर हरभरा पेरला (Chana Sowing) आहे. गव्हाचे पेरणी (Wheat Sowing) क्षेत्रही सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांढला आहे. त्यामुळे यंदा रब्बीमध्ये विक्रमी पेरा होत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पाच महिन्यातच वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३० टक्के पाऊस झाला आहे. या तुफान पावसामुळे जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह कोल्हापुरी बंधारे, उच्च पातळी बंधाऱ्यांत शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे.
परिणामी जमिनीतील जलस्त्रोत बळकट झाल्याने रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होत आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर आहे. या तुलनेत आतापर्यंत १४४ टक्क्यानुसार तीन लाख ३६ हजार ६०९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक दोन लाख ५६ हजार ३२० हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. यासोबतच गहू ३२ हजार १०३ हेक्टर, रब्बी ज्वारी २४ हजार ५ हेक्टर, करडई चार हजार ४९८ हेक्टर,
रब्बी मका सहा हजार ६३ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
रब्बीमधील नियोजीत
पेरणी क्षेत्र
हरभरा दोन लाख ५६ हजार ३२० हेक्टर
गहू ३२ हजार १०३ हेक्टर
रब्बी ज्वारी २४ हजार ५ हेक्टर
रब्बी मका सहा हजार ६३ हेक्टर
करडई चार हजार ४९८ हेक्टर
एकूण तीन लाख ३६ हजार ६०९ हेक्टर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.