Grampanchyat Election : सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा ‘राष्ट्रवादी’चा दावा

नगर जिल्ह्यात भाजप दुसऱ्या स्थानी, संगमनेर तालुका काँग्रेसमय
 Grampanchyat Election
Grampanchyat ElectionAgrowon

नगर ः जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष, नेत्यांत दावे करण्यात चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक सरपंचपद व सदस्यांसह सुमारे ८३ ग्रामपंचायतीवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या याची आकडेवारीच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे.

 Grampanchyat Election
Grampanchyat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी ठरली अव्वल

नगर जिल्ह्यात नुकत्याच २०३ ग्रांमपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या वेळी शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर थेट जनतेतून सरपंचपदाची निवड करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकांत नगर जिल्ह्यात सर्वाधिक सरपंच, सदस्य संख्येसह सुमारे ८३ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी राष्ट्रवादीने जिंकलेल्या ग्रामपंचायतीसह इतर कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या याची आकडेवारीच जाहीर केली आहे. ग्रामपंचायती जिंकण्यात भारतीय जनता पक्ष दुसऱ्या स्थानी असल्याचे राष्ट्रवादीनेच कबूल केले आहे. माजी महसूलमंत्री बाऴासाहेब थोरात यांचा संगमनेर तालुका काँग्रेसमय असून येथे २७ व श्रीगोंद्यात एक अशा २८ ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या.

 Grampanchyat Election
Grampanchayat Election : धानोरा, सोमावल बुद्रूक ग्रामपंचायती बिनविरोध

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १६, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक ग्रामपंचायत मिळाली. स्थानिक पातळीवर झालेल्या आघाडीला सात ग्रामपंचायती मिळाल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय चिन्हे वापरली नसली तरी पहिल्यांदाच राजकीय पक्षांनीन जाहीरपणे सत्ता मिळाल्यावर दावा केला आहे. जिल्ह्यात या वेळी लोकांनी सरपंच निवडण्याचा अधिकार असल्याने यंदा अने प्रस्थापितांना सत्ता गमवावी लागली. अनेक ठिकाणी तरुण तरुण निवडून आले आहेत.

प्रमुख नेत्यांच्या गावांतच त्यांना हार मानावी लागली. जनतेतून सरपंचपदच्या निवडीत काहींची नशिबाने संधी हुकली. अगदी पाच-दहा मताने पराभवाला सामोरे जावे लागले. पारनेरमधील चोंबुत येथे कांचन शेळके दोन मताने निवडून आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com