Grape Pruning : द्राक्ष बागांची फळछाटणी अधांतरी

यंदाच्या हंगामातील फ‍ळ छाटणी करण्यासाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. फळ छाटणीसाठी परराज्यातील मजूर येत्या पाच ते सहा दिवसांत जिल्ह्यात दाखल होतील. त्याचबरोबर स्थानिक मजूरही फळ छाटणीसाठी तयार आहेत.
Grape Pruning
Grape Pruning Agrowon

सांगली ः जिल्ह्यातील द्राक्षाची फळ छाटणी (Grape Pruning) येत्या पंधरा दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु, गेल्या वर्षी अतिवृष्टी (Heavy Rain) आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे (Post Monsoon Rain) द्राक्षाचे कोट्यवधींचे (Grape Crop Damage) नुकसान झाले होते. त्यामुळे हाती अपुरा पैसा आला. आता फळ छाटणी (Crop Pruning) समोर आली आहे. बागेला पैसा अपुरा पडू लागला आहे. कर्जाचा डोंगर वाढला आहे. हाती पुरेसे भांडवल नाही. त्यामुळे पैसा कसा उभा करायचा, फळ छाटणी कशी करायची, असा प्रश्न द्राक्ष उत्पादकांसमोर उभा आहे.

Grape Pruning
Grapes : द्राक्ष बागेत रोगनियंत्रणाकडे लक्ष देणे गरजेचे

जिल्ह्यात द्राक्षाचे सरासरी १ लाख ३० हजार एकरांवर क्षेत्र आहे. यंदाच्या हंगामातील फ‍ळ छाटणी करण्यासाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. फळ छाटणीसाठी परराज्यातील मजूर येत्या पाच ते सहा दिवसांत जिल्ह्यात दाखल होतील. त्याचबरोबर स्थानिक मजूरही फळ छाटणीसाठी तयार आहेत. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काही प्रमाणात फळ छाटणीस प्रारंभ होतो. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोंबर या दोन महिन्यांत जिल्ह्यातील द्राक्षाची फळ छाटणी पूर्ण होते.

Grape Pruning
Grape : अतिवृष्टीचा द्राक्षबागांवर परिणाम

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून द्राक्ष बागांचे नुकसान झाले. त्यातच गेल्यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. त्यामुळे फुलोरावस्थेतील बागांचे नुकसान झाले. तर, आगाप फळ छाटणी केलेल्या काढणीस आलेल्या द्राक्षे कुजली. तसेच लहान मनी वेलीवरच कुजून केली. रोगाचा प्रादुर्भाव वाढला. ‘डाऊनी’मुळे बाधित झालेली द्राक्षे काढून रस्त्यावर फेकली. ४० टक्के राहिलेली द्राक्षे विक्री केली. पण अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे हातात पैसा कमी आला. अतिवृष्टीमुळे बागा धोक्यात आल्या होत्या. त्या बागा वाचविण्यासाठी दुप्पट खर्च झाला. यंदाच्या खरड छाटणी पासून ते आतापर्यंत शिल्लक असलेला पैसा खर्च केला. आता फळ छाटणी तोंडावर आली आहे.

गेल्या दोन वर्षांत द्राक्ष उत्पादकांवर नैसर्गिक संकट आले. त्यातून बागा वाचविल्या. आता यंदा फळ छाटणीसाठी पैसा अपुरा आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने फळ छाटणी करण्याचा विचार शेतकरी करीत आहेत. पैसे उपलब्ध करण्यासाठी बैंका, सोसायट्यांकडे हेलपाटे सुरु आहेत. मात्र कर्ज मिळेल की नाही हे सांगणे कठीण आहे.
महादेव लाड, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कुंडल, ता. पलूस

उधारी फिटेना, खते मिळेना

द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेला लागणारी खते बहुतांश कृषी सेवा केंद्रातून उधारीवर आणतो. पैसे हातात येतील तसे तो गरज भागवतो. परंतु गेल्यावर्षीची अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. पैसा कमी आला. त्यामुळे गेल्यावर्षीची खते, कीडनाशकांची उधारी अजून शेतकऱ्यांना देता आलेली नाही. आता ही उधारी दिल्याशिवाय दुसरी खते मिळणार नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा कृषी सेवा केंद्राची उधारी देण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com