द्राक्ष बागायतदार संघाचा उद्यापासून पुण्यात मेळावा

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा वार्षिक मेळावा उद्या (ता.२८) पुण्यात होत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत तीनदिवसीय द्राक्ष परिषद होत आहे.
Grape
GrapeAgrowon

पुणे ः महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा (Maharashtra Rajya Draksh Bagaytdar Sangh) वार्षिक मेळावा उद्या (ता.२८) पुण्यात होत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Sinde) व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद (Sharad Pawar) पवार यांच्या उपस्थितीत तीनदिवसीय द्राक्ष परिषद होत आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर वाकड येथील पुलाजवळच्या टीपटॉप इंटरनॅशनल येथे सकाळी ११ वाजता संघाच्या मेळाव्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी श्री. पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक व ‘अपेडा’चे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथु उपस्थित राहतील.

Grape
Grape : प्लॅस्टिक आच्छादनाने केले द्राक्ष बागेचे संरक्षण

बागाईतदार संघाचे कोशाध्यक्ष सुनील पवार म्हणाले, ‘‘कोरानामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर संघाचा प्रत्यक्ष मेळावा होत आहे. त्यामुळे राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. या निमित्ताने होत असलेल्या द्राक्ष परिषदेत यंदा देशी व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाबरोबरच, प्रक्रिया, वाइन, बेदाणा या विषयांवर देशविदेशातील नामांकित शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळेल.

Grape
Grapes : आगाप छाटणीच्या बागेचे व्यवस्थापन

परिषदेच्या तांत्रिक परिसंवादात विदेशी द्राक्ष अभ्यासक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, प्रयोगशील बागाईतदार तसेच द्राक्ष प्रक्रिया उद्योगातील तज्ज्ञ सहभागी होत आहेत.” मेळावा व प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा गेल्या काही दिवसांपासून संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, कोषाध्यक्ष सुनील पवार व मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यांच्याकडून घेतला जात आहे. परिषदेचे तीन दिवसांचे शुल्क शेतकऱ्यांसाठी एक हजार रुपये आहे. परिषदेतील तांत्रिक कामकाज समाप्त होताच मंगळवारी (ता. ३०) त्याच ठिकाणी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

प्रदर्शनाचे आयोजन

परिषदेच्या निमित्ताने मेळाव्याच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात द्राक्ष व वाइन उत्पादन, द्राक्षावर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले उपपदार्थ, देशी व विदेशी बाजारासाठी बेदाणा उत्पादन, द्राक्ष शेतीसाठी उपयुक्त ठरणारी कृषी यंत्रे व अवजारे, माहिती तंत्रज्ञानाशीसंबंधित प्रणाली व उपकरणे मांडली जाणार आहेत. निविष्ठा उद्योगातील नामांकित कंपन्या आपापल्या उत्पादनांसह या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com