पश्चिम महाराष्ट्राच्या तापमानात मोठी घट

पावसाच्या उघडिपीनंतर तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्राच्या तापमानात मोठी घट
Weather ForecastAgrowon

पुणे : पूर्व मोसमी पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान सरासरीच्या खाली आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले. पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, सातारा आणि सोलापूर येथे कमाल तापमानाचा पारा २० ते २९ अंशांपर्यंत खाली आहे. तेथे तापमानात सरासरीच्या तुलनेत ८ ते १२ अंशांची घट झाली. उर्वरित राज्यातही तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले.

पावसाने उघडीप देताच तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण कर्नाटक आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आंध्रप्रदेशातील रायलसीमाकडे सरकली आहे. राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.६, धुळे ४२.०, जळगाव ४२.४, कोल्हापूर २३.१, महाबळेश्वर २०.४, नाशिक ३४.२, निफाड ३५.२, सांगली २६.२, सातारा २८.१, सोलापूर २९.६, सांताक्रूझ ३३.४, डहाणू ३४.१, रत्नागिरी २६.५, औरंगाबाद ३९.३, परभणी ४१.२, नांदेड ३९.८, अकोला ४४.५, अमरावती ४४.२, बुलडाणा ४०.४, ब्रह्मपुरी ४१.७, चंद्रपूर ४१.८, गोंदिया ४१.५, नागपूर ४१.४, वर्धा ४१.८, यवतमाळ ४२.२.

मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. २०) मॉन्सूनने अरबी समुद्रात प्रगती केली आहे. दक्षिण अरबी समुद्र, मालदीवच्या दक्षिणेकडील भागात मॉन्सून दाखल झाला आहे. तर पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली. शनिवारी (ता. २१) मॉन्सूनच्या वाटचालीची स्थिती ‘जैसे थे’ होती.
---
पुणे : सोमवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशभरातील कमाल तापमानाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com