ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन: गडकरी

ग्रीन हायड्रोजन (Green hydrogen) हे भविष्यातील इंधन आहे. या शिवाय इथेनॉलवर वाहने चालविल्यास नागरिकांची मोठी बचत होईल.
Green hydrogen
Green hydrogenAgrowon

नागपूरः ‘‘सौरऊर्जेवरच अवलंबून न राहता आता ग्रीन हायड्रोजनचा (Green hydrogen) वापर वाढायला पाहिजे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. या शिवाय इथेनॉलवर वाहने चालविल्यास नागरिकांची मोठी बचत होईल. तसेच रासायनिक उद्योगाशिवाय जिथे बॉयलरचा वापर होतो, अशा ठिकाणी ग्रीन हायड्रोजनचा वापर व्हावा,’’ असे मत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया रिन्युवेबल एनर्जी असोसिएशनच्या (AIREA) नागपूर मुख्यालयाच्या स्थापना समारंभात उद्‍घाटक म्हणून गडकरी बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण-महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप उपस्थित होते.

Green hydrogen
शंभर टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन द्या:झुनझुनवाला

गडकरी म्हणाले, ‘‘उद्योजक सोलर रूफ पॅनेलच्या साह्याने वीज वापरतात. त्यांना वीजबिलात अनुदान मिळेल, अशी योजना केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने तयार केली होती. परंतु त्याला वितरण कंपन्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.’’

Green hydrogen
‘इंडियन डेअरी असोसिएशन’च्या उपाध्यक्षपदी अरुण पाटील

‘‘महावितरण कंपन्यांच्या वितरणामध्ये १० लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान होत आहे. त्यामुळे ‘वीज प्रीपेड कार्ड’ ही प्रणाली आणण्याची योजना केंद्रीय मंत्रिमंडळापुढे आहे. सौरऊर्जेपासून सार्वजनिक स्थळावर तसेच सार्वजनिक परिवहन व्यवस्था संचालित केल्यास विजेची बचत होईल. सौरऊर्जेचा वापर ‘महामेट्रो नागपूर’सुद्धा करत आहे. परंतु यावरच अवलंबून न राहता ग्रीन हायड्रोजनचा वापर वाढवावे,’’ असे आवाहन गडकरी यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com