Groundnut Cultivation : खानदेशात भुईमूग लागवड पूर्ण

पाच वर्षांपूर्वी खानदेशात भुईमूग लागवड २०० ते २५० हेक्टर एवढीच मर्यादीत होती. परंतु मागील चार वर्षे लागवड वाढली आहे.
Groundnut Cultivation
Groundnut CultivationAgrowon

Jalgaon Agriculture News : खानदेशात भुईमुगाची लागवड (Groundnut Cultivation) अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. यंदा लागवड बऱ्यापैकी आहे. सुमारे १८०० हेक्टरवर ही लागवड झाली असून, सातपुडा पर्वतालगतच्या भागात लागवड अधिक आहे.

पाऊसमान (Jalgoan Rain) मागील चार वर्षे बरे असल्याने भुईमूग लागवड वर्षागणिक वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी खानदेशात भुईमूग लागवड २०० ते २५० हेक्टर एवढीच मर्यादीत होती. परंतु मागील चार वर्षे लागवड वाढली आहे.

कोविडच्या वर्षातही लागवड स्थिर होती. यंदा ही लागवड वाढली असून, ती सुमारे १८०० हेक्टरवर झाली आहे. नंदुरबार भागात गुजरातमधील काही खरेदीदार भुईमुगाची थेट खरेदी करतात.

Groundnut Cultivation
Summer Groundnut Verity : उन्हाळी भुईमुगासाठी निवडा सुधारित वाण

तर धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल भागातील भुईमूग मध्य प्रदेशात काही शेतकरी पाठवितात. तसेच जळगाव जिल्ह्यात काही शेतकरी थेट तेल उत्पादक कारखान्यांना शेंगांचा पुरवठा करतात. त्यास मागील दोन वर्षे साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.

Groundnut Cultivation
हिंगोलीमध्ये भूईमूग शेंगा प्रतिक्विंटल ५५०० ते ६००५ रुपये

उत्पादनही बरे होते. वाळविलेल्या शेंगांचे एकरी पाच ते सहा क्विंटल एवढे उत्पादन हाती आले. तसेच खर्चही इतर पिकांच्या तुलनेत कमी होता. त्यावर फवारणी व अधिक रासायनिक खतांची गरज नसल्याने काही शेतकरी अनेक वर्षे लागवड करीत आहेत.

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे असे चार महिन्यांचे हे पीक आहे. काही शेतकऱ्यांनी जानेवारीच्या सुरवातीलाच लागवड केली होती. त्यामुळे एप्रिलमध्येही काढणी सुरू होईल. अनेक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी मध्यम, काळी कसदार जमीन निवडली आहे.

सिंचनासाठी ठिबकचा उपयोग काही शेतकरी करीत आहेत. कारण पिकास पाणी अधिक लागते. उष्णतेत सिंचन करताना धावपळ होते. त्यामुळे ठिबकवर किंवा तुषार सिंचनाच्या मदतीनेदेखील भुईमूग लागवड करण्यात आली आहे.

मागील हंगामात काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाच्या मदतीन वाळविलेल्या शेंगांचे एकरी सात क्विंटलवर उत्पादन साध्य केले होते. त्यात नफा वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Groundnut Cultivation
कृषी सल्ला : भूईमूग, लसूण घास, कांदा, भाजीपाला

पिकाला सुरवातीला एक बेसल डोस देण्यात आला आहे. तसेच या महिन्यात आणखी एक खतांचा डोस शेतकरी देतील. काळ्या कसदार जमिनीत सध्या १२ ते १३ दिवसाआड पाणी दिले जात आहे. पुढे सात ते आठ दिवसाआड पाणी द्यावे लागेल.

खानदेशातील या भागात लागवड...

जळगाव जिल्ह्यात सुमारे १२०० हेक्टरवर भुईमूग आहे. चोपडा, यावल, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, जामनेर या भागात लागवड बऱ्यापैकी आहे. धुळ्यात शिरपूर, साक्री, नंदुरबारात नवापूर, तळोदा भागात भुईमूग लागवड आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com