Cotton : खारपाण पट्ट्यात पावसाने कपाशीची वाढ खुंटलेलीच

सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. सोयाबीन, मूग, उडीद ही पिके आधीच हातातून गेल्यासारखी आहेत. तोच कपाशीच्या पिकाचेही उत्पादन घटण्याची शक्यता बळावली आहे.
Cotton
Cotton Agrowon

अकोला ः सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात खारपाण पट्ट्यातील (Rain Hit Salty Soil Belt Farmer) शेतकऱ्यांना बसला आहे. सोयाबीन (Soybean), मूग (Moong), उडीद (Urad) ही पिके आधीच हातातून गेल्यासारखी आहेत. तोच कपाशीच्या पिकाचेही उत्पादन (Cotton Production) घटण्याची शक्यता बळावली आहे. जास्त प्रमाणातील पावसामुळे या भागातील कपाशीची वाढच (Cotton Crop Growth) झालेली नाही. पाऊस थांबलेला असला तरी या शेतांमध्ये वाफसा व्हायला अजून प्रतीक्षा आहे.

Cotton
Cotton : कपाशीवर घोंगावतेय गुलाबी बोंड अळीचे संकट

यंदा कापसाला चांगला दर मिळाल्याने खारपाण पट्ट्यात सोयाबीन व इतर पिकांचे क्षेत्र कमी करून शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. जिल्ह्यात यंदा कपाशीचे क्षेत्र दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक झाले आहे. यात खारपाण पट्ट्यातील कोरडवाहू कपाशीचाच वाटा सर्वाधिक आहे. या भागातील शेतीला कमी किंवा जास्त, असा दोन्ही प्रकारचा पाऊस मारक ठरत असतो. यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने पाऊस पडल्याने सर्वाधिक नुकसान केले आहे.

Cotton
Cotton : कापूस पट्ट्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू लागला

जिल्ह्यात अकोट, अकोला, तेल्हारा तालुक्यांत पसरलेल्या या खारपाण पट्ट्यातील कपाशीची वाढच फारशी झालेली नाही. पेरणीनंतर आता सुमारे कुठे दोन तर कुठे अडीच महिने पूर्ण झाले. असे असतानाही कपाशीच्या झाडांची जेमतेम वाढ झालेली दिसत आहे. आधीच हा कोरडवाहू भाग आहे. पावसाच्या पाण्यावरच पिकाचे भवितव्य अवलंबून राहते. कपाशीच्या पिकाला आता हा पाऊस जास्त झाल्याने फटका बसला आहे. पिकाची सध्याची अवस्था लक्षात घेतली तर उत्पादनात आताच ४० टक्क्यांपर्यंत घटीची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. वास्तविक कपाशीचे पीक कोरडवाहू पद्धतीने घेऊन सुद्धा शेतकऱ्यांना चांगले उत्पादन दरवर्षी व्हायचे. मागील हंगामातील कापसाला तर १० हजारांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे वाढला.

शेकडो हेक्टरवरील कपाशीत पाणी

गेल्या आठवडाभरापासून या भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. सुपीक जमिनीत वाफसा तयार होऊन आंतरमशागतीची कामेही सुरू झाली आहेत. मात्र खारपाण पट्ट्यात शेकडो एकरातील कपाशीच्या पिकात अद्यापही पाणी, ओलसरपणा अधिक आहे. त्यामुळे मशागतीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. पीकवाढीसाठी आता पाऊस न येणे, खतमात्रा, आंतरमशागतीला खूप महत्त्व आहे. आतापर्यंत पिकाची अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकरी उत्पादनाविषयी शंका घेत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com