India Agriculture : युवा पिढीला कृषी क्षेत्राकडे आकर्षिक करण्यासाठी मार्गदर्शन

ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा संधी तसेच सोयी सुविधांचा अभाव हा स्थलांतराला कारणीभूत ठरला आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

वाशीम ः ग्रामीण भागात रोजगाराच्या (Rural Employment) पुरेशा संधी तसेच सोयी सुविधांचा अभाव हा स्थलांतराला कारणीभूत ठरला आहे. परिणामी शहरे फुगत आहेत. त्यावर मात करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (ICAR) आर्या प्रकल्पांतर्गत युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करून शेतीमध्ये स्थिरता निर्माण करून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला (Employment Generation) चालना देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेतर्फे ५ ते ८ डिसेंबरदरम्यान उद्योजकता विकास व कृषी प्रक्रिया उद्योग या विषयावरील कौशल्य प्रशिक्षण घेण्यात आले.

Indian Agriculture
Solar Agricultural Pumps : सौर कृषिपंप देण्याच्या नावाखाली फसवणूक

या प्रशिक्षणाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे, गुरुकृपा सेवा आश्रमाचे व्यवस्थापक सुनील दशमुखे, गृह विज्ञान विभागाच्या प्रमुख शुभांगी वाटाणे, विषय विशेषज्ञ उद्यानविज्ञा निवृत्ती पाटील यांच्या उपस्थितीत झाले.

Indian Agriculture
Agriculture Electricity : एक लाख पाच हजार वीजजोडण्या देण्याचा निर्धार

या प्रशिक्षणाच्या तांत्रिक सत्रात डॉ. काळे यांनी कृषी अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी, पोषण परस बागेचे महत्त्व, वाण, डाळ प्रक्रिया, मत्स्य खाद्य व कोंबडी खाद्य युनिट उभारणीबाबत माहिती दिली. शुभांगी वाटाणे यांनी विविध कृषी प्रक्रिया उद्योग जसे सोया प्रक्रिया उद्योग, डाळमिल, फळे भाजीपाला उद्योग या विषयावर सखोल मार्गदर्शन करून सोया दूध, पनीर, विविध प्रकारचे लोणची, विविध प्रकारचे सरबते, स्क्वॉश इत्यादीचे प्रात्याक्षिक करून अन्न पदार्थांच्या पॅकिंग, लेबलिंग, ब्रॅण्डिंग, विविध परवाने नोंदणी व मार्केटिंग यावर मार्गदर्शन केले.

किटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी उद्योजकता विकास, उद्योजकाच्या अंगी असणारी कौशल्य व गुण यावर प्रकाश टाकला. या प्रशिक्षणादरम्यान रामा देशमुख व आदित्य देशमुख यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावरील विविध युनिटची माहिती दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com