Agriculture : कृषी संचालकांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पुणे आयुक्तालयातील कृषी संचालक डॉ. आर. जे. भोसले यांनी ‘एक दिवस बळीराजासाठी’ अंतर्गत धावरी बु. (ता. भोकर) या गावास भेट देऊन ग्रामसभेस कापूस, सोयाबीन या पिकाचा जमा खर्च व अनावश्यक खर्च टाळण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
Agriculture
AgricultureAgrowon

नांदेड : पुणे आयुक्तालयातील कृषी संचालक डॉ. आर. जे. भोसले यांनी ‘एक दिवस बळीराजासाठी’ अंतर्गत धावरी बु. (ता. भोकर) या गावास भेट देऊन ग्रामसभेस कापूस, सोयाबीन (soybean) या पिकाचा (Crop) जमा खर्च व अनावश्यक खर्च टाळण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

धावरी येथे भोसले यांनी गावात शिवार फेरी घेऊन गावातील विविध समस्या जाणून घेतल्या. त्यावर काही सूचना व उपाय सुचविले. यासोबतच पिकावर होणारा अनावश्यक खर्च टाळण्याबाबत विविध उपाय सुचविले. गावामध्ये शेतकऱ्यांनी लोक सहभागातून उभारलेल्या वनराई बंधाऱ्याचे उद्घाटन व जलपूजन केले.

परिसरातील पेरू, सीताफळ फळबागेस भेट देऊन अधिक उत्पादन घेण्याच्या विविध उपयोजना सुचविल्या. घण लागवडीत झाडांच्या छाटणीबाबत शेतकऱ्‍यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला शेतकरी, शेतकरी गटांचे शेतकरी, किनवट उपविभागीय कृषी अधिकारी आर. डी. रणवीर,मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Agriculture
Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com