Tadoba National Park : इंग्रजीत बोलणार ताडोबातील गाइड

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. भाषेअभावी स्थानिक संस्कृती, वनांची माहिती पर्यटकांना देताना गाइडला मोठी कसरत करावी लागते.
Tadoba National Park
Tadoba National ParkAgrowon

चंद्रपूर ः ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. भाषेअभावी स्थानिक संस्कृती, वनांची माहिती पर्यटकांना देताना गाइडला मोठी कसरत करावी लागते. हा भाषिक अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने आता ताडोबातील गाइडला इंग्रजी भाषा शिकण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Tadoba National Park
Agriculture Management : लागवडीसह विक्री पद्धतीतील सुधारणांमुळे उत्पन्नात वाढ

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर आणि बफर उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या प्रेरणेतून हा प्रयोग करण्यात येत आहे.

व्यक्तिमत्त्व विकासाचे धडेही देणार

ताडोबात असणारा गाइड हा वनविभागामार्फत प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी व्हावे यासाठी गाइड यांचे व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमासह त्यांना इंग्रजी भाषेचे धडे देण्यात येत आहे. पर्यटनाच्या माध्यमातून ताडोबा प्रशासनाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता भाषिक कौशल्य आत्मसात केल्याने होणारे पर्यटनसुद्धा अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com