Animal Care : कुशिरे येथे पशुपालकांना शिबिरात मार्गदर्शन

गोपूजनाने शिबिराचा प्रारंभ झाला. शिबिरात जंत, गोचीड निर्मूलन, वंध्यत्व निवारण, रोग निदान, मलमूत्र सांडपाणी व्यवस्थापन, निकृष्ट चारा सकस करणे, उन्हाळ्यात भासणारी चाराटंचाई कशी दूर करता येईल.
Livestock
LivestockAgrowon

Animal Care फुलवडे, जि. पुणे ः आंबेगाव तालुक्यातील पाटण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत कुशिरे हे गाव कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत (Village Adopation Scheme) दत्तक घेण्यात आले असून, या अंतर्गत बुधवारी (ता. २२) पशुपालकांसाठी मार्गदर्शन शिबिर पार पडल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. पूजा बोंबले यांनी दिली.

Livestock
Animal Care : जनावरांच्या आजारांवर कोरफड, गोखरु, हळद गुणकारी

गोपूजनाने शिबिराचा प्रारंभ झाला. शिबिरात जंत, गोचीड निर्मूलन, वंध्यत्व निवारण, रोग निदान, मलमूत्र सांडपाणी व्यवस्थापन, निकृष्ट चारा सकस करणे, उन्हाळ्यात भासणारी चाराटंचाई कशी दूर करता येईल. तसेच ॲझोला व हायड्रोपोनिक मका बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून जंतुनाशक व गोचीडनाशक गोळ्या, औषधांचे वाटप करण्यात आले.

Livestock
Animal Care : जनावरांच्या आजारांवर गुणकारी असणाऱ्या वनस्पतींची माहिती

आंबेगावच्या पश्‍चिम भागातील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत साळवे, डॉ. युवराज रघतवान, डॉ. मिलिंद भोईर, डॉ. रूपेश खामकर, डॉ. मधुकर सुरकुले, डॉ. संदीप हिंगे, डॉ. प्रशांत कर्डिले, डॉ. ओंकार दाते, डॉ. सचिन भोईर, प्रभाकर पन्हाळे, दत्ता मेचकर, सोपान मोरमारे, सुधीर लोहकरे, आश्‍विनी काळे यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कुशिरेचे सरपंच चंद्रकांत भोईर, दिलीप मुदगुण, उपसरपंच अमोल दाते, ग्रामसेवक मंगेश केंगले, लाडबा देठे, हैबत धादवड, शिवाजी धादवड, दिनेश धादवड, चिंतामण दाते, ब्रह्मा हेमाडे, गणेश भोईर, सखुबाई दाते, मंगल दाते तसेच पशुपालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com