गायरानावरील अतिक्रमणावर हातोडा

जिल्ह्यातील शासकीय जमिनींवरील १७०० हून अधिक अतिक्रमणावर प्रशासनाकडून हातोडा पडणार आहे.
Administration
AdministrationAgrowon

कऱ्हाड ः जिल्ह्यातील शासकीय जमिनींवरील १७०० हून अधिक अतिक्रमणावर प्रशासनाकडून हातोडा पडणार आहे. अतिक्रमण काढल्यामुळे संबंधित अतिक्रमीत जागा मोकळा श्‍वास घेणार आहेत. मात्र दुसरीकडे अनेक वर्षे त्या जागेवर वास्तव्य करणाऱ्या अनेकांचा निवारा हिरावला जाणार आहे.

अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्ह्यात मोहीम हाती घेण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ डिसेंबपर्यंत सर्व अतिक्रमणे काढण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. त्यात पोलिस उपाधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक, बांधकाम उपअभियंता, पाणीपुरवठा उपअभियंता, महावितरणचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, भूमिअभिलेख उपाधीक्षक यांचा समावेश आहे. या समितीद्वारे गायरान जमिनी आता अतिक्रमणमुक्त करण्यात येतील.

Administration
Cereal Crop : पौष्टिक तृणधान्य पिकांसाठी तालुकानिहाय आराखडे तयार करा

...अशी होणार कार्यवाही

गायरान जमिनींवरील अतिक्रमण काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार गावनिहाय आराखडा तयार करून २२ नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात येईल. त्यानंतर अतिक्रमणाचा सविस्तर अहवाल सादर केला जाईल. पोलिस बदोबस्ताची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर २३ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान अतिक्रमणे काढण्यात येतील. त्यानंतर २४ डिसेंबपर्यंत संबंधित करवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात देण्याची कार्यवाही केली जाईल.

अनेक कुटुंबे होणार बेघर

गल्या अनेक वर्षांपासून अनेकांनी अतिक्रमण केलेल्या जागेत वास्तव्य ठेवले आहे. काहींनी घरेही बांधली आहेत. त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे काढताना वादावादीचेही प्रसंग उद्‍भवण्याची शक्यता आहे. त्यालाही प्रशासनाला तोंड द्यावे लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com