Mango Crop Damage : उन्हाचा चटका हापूसला फटका

उन्हाच्या वाढलेल्या चटक्याचा सिंधुदुर्गातील हापूसला मोठा फटका बसत आहे. परिपक्व होण्याच्या स्थितीतील आंबा जमिनीवर पडत असल्याचे चित्र आहे.
Hapus Mango Crop Damage
Hapus Mango Crop Damage Agrowon

Mango Crop Damage Sindhudurg : उन्हाच्या वाढलेल्या चटक्याचा सिंधुदुर्गातील हापूसला (Hapus Mango Damage) मोठा फटका बसत आहे. परिपक्व होण्याच्या स्थितीतील आंबा जमिनीवर पडत असल्याचे चित्र आहे.

यामध्ये बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील अपेक्षित उत्पादन (Mango Production) न आल्यामुळे या वर्षीचा आंबा हंगाम (Mango Season) एप्रिल अखेरीला आटोपण्याची शक्यता काही बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील तापमानवाढीने या वर्षी कहर केला. फेब्रुवारी महिन्यात ३९ डिसेंबरपर्यंत तापमान पोहोचले होते. त्यातच किमान आणि कमाल तापमानात मोठा फरक राहिला.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आहे. उन्हाच्या चटक्यांचा हापूसवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

परिपक्व स्थितीतील आंबा एका बाजूने करपणे, त्यानंतर गळून पडणे असे प्रकार देवगड तालुक्यातील काही गावांमध्ये दिसून येत आहेत. यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे हा प्रकार सुरू असल्याचा काही बागायतदारांचा दावा आहे.

Hapus Mango Crop Damage
Desi Mango : गावरान आंबा होतोय दुर्मिळ

आंब्यामध्ये फळगळीचे प्रमाण वाढले असताना दुसरीकडे या वर्षीचा आंबा हंगामच एप्रिल अखेरीपर्यंत आटोपण्याची शक्यता आहे. या वर्षी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोराचे आंबा उत्पादन सध्या सुरू आहे.

या दोन टप्प्यांतील आंबा हंगाम अजून दहा ते बारा दिवस चालण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोराला वाढलेल्या तापमानवाढीचा फटका बसला.

अनेक भागांत फळधारणा झालीच नाही. तर काही बागायतदारांनी हा आंबा मेअखेरीला येणार असल्यामुळे व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मे महिन्यात या वर्षी आंबा मिळेल की नाही, अशी स्थिती राहील.

Hapus Mango Crop Damage
Mango Production : यंदा आंबा उत्पादनात घट

मेमध्ये दरवाढीची शक्यता

जिल्ह्यात सध्या हापूस आंब्याच्या पेटीचा दर ३ हजार ते ४ हजार रुपयांपर्यंत आहेत. प्रतिडझन ८०० ते १२०० रुपयांपर्यंत देवगडमध्ये आंबा विक्री सुरू आहे. मे महिन्यात आंब्यांचा तुटवडा जाणवल्यास दर वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात तापमान वाढ झाली होती. परंतु सध्या तितके तापमान नाही. ज्या बागांमध्ये तुडतुडा, थ्रीप्स किंवा करपा यांसारख्या कीड-रोगांकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम फळगळीत होऊ शकतो. त्यामुळे आंब्यांची फळगळ नेमकी कशामुळे होतेय, हे तपासावे लागेल. आंबा हंगाम मात्र दरवर्षीच्या तुलनेत काहीसा लवकर आवरेल, अशी शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com