Heavy Rain : पूल वाहून गेल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल

ओझरखेड-वरखेडा रस्त्यावरील ओझरखेड शिवारात उनंदा नदीवर असलेला पूल वाहून गेला असून, ओझरखेड शिवारातील शेतकरी व ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प झाल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
Nashik Rain
Nashik RainAgrowon

वणी, ता. दिंडोरी : ओझरखेड-वरखेडा रस्त्यावरील ओझरखेड शिवारात उनंदा नदीवर असलेला पूल वाहून (Bridge Washed Away In Nashik) गेला असून, ओझरखेड शिवारातील शेतकरी व ग्रामस्थांचे दळणवळण (Road Bloak Due To Bridge Washed Away) ठप्प झाल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल (Hardship To Farmer And Student) होत आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणच्या नद्या, नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी झालेले नुकसान समोर येत आहे. त्यात अतिमहत्त्वाचा रस्ता म्हणजे ओझरखेड ते वरखेडा येथील पूल वाहून गेल्याने दोन्ही गावांचा जाण्या-येण्याचा संपर्क तुटल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.

Nashik Rain
Rain Updates: नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात दाणादाण

ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उनंदा नदीत होत असल्याने या नदीवरील कमी उंचीच्या असलेल्या या पुलाचा अर्धा भाग पाण्याच्या वेगाने वाहून गेला आहे. वरखेडा, ओझरखेड शिवारातील शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वणीकडे किंवा ओझरखेड गावात येण्यासाठी तसेच वणी, ओझरखेड गाव बाजूने वरखेडा येथे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु सध्या संततधार पावसाने येथील पूल वाहून गेल्याने विद्यार्थी, नागरिक, प्रवासी, शेतकऱ्यांना येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच हा पूल वाहून गेल्याचा आरोप ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे व ग्रामस्थांनी केला असून शेतकरी, विद्यार्थ्यांची होणारे हाल, गैरसोय लक्षात घेऊन शासनाने नव्याने अधिक उंचीचा असलेला पूल बांधून द्यावा, अशी मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com