Kharif Crop Harvesting : खरीप पिकांच्या काढणी, मळणीची कामे वेगात

बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान
Kharif Crop Harvesting
Kharif Crop Harvesting agrowon

पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने (rain) उघडीप दिली आहे. पावसानंतर रब्बीसाठी शेतीच्या मशागतीच्या, तर खरीप हंगामातील (Kharif season) पिकांच्या काढणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यामध्ये बाजरी, सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या काढणीच्या व मळणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर रब्बी हंगामासाठी (Rabi season) शेताची मशागतीला वेग आला आहे.

जिल्ह्यात खरिपाचे एक लाख ९५ हजार ७१० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख ९६ हजार ३१५ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसाने बाजरीचे पीक खराब झाले. भुईमूग, सोयाबीन पिकांची पेरणी झाली होती; परंतु त्यातील पिके हाती लागली नाहीत. शेतकऱ्यांच्या हातात आता काही उरले नाही. निथळ जमिनीतील पिकांचे उत्पन्न काहीसे हाती लागले आहे.

Kharif Crop Harvesting
Lumpy Skin : लम्पीची मदत तोकडीच ? | ॲग्रोवन

उत्पन्न घटले

अति आणि सततच्या पावसामुळे बाजरी सोयाबीन आणि भुईमुगाचे उत्पन्न घटले आहे. तर बाजरी पावसामुळे आडवी पडून कणसांमध्ये दाणे अंकुरले आहेत. तर सोयाबीन आणि आणि भुईमूग काढणी उशिरा झाल्याने तेही उगवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामना करावा लागत आहे.

निसर्गाच्या अनियमिततेमुळे नुकसान

दिवाळी उलटून गेली तरीही जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरु झालेली नाही. थोड्याफार प्रमाणात उथळ क्षेत्रात व कमी पाणी असलेल्या क्षेत्रांमध्ये मशागतीची कामे सुरू आहेत; परंतु गहू, हरभरा, ज्वारी पेरणीला दिरंगाई होत असल्याची स्थिती आहे.

त्यामुळे खरीप हंगाम यंदा उशिरा संपला आणि रब्बी हंगाम उशिरा सुरू झाला आहे. निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com