Soybean Harvesting : बाजरी, सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात

सोयाबीन काढणीला एकरी ५ हजार तर बाजरी काढणी आणि खुडणीसाठी एकरी ८ हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे.
Soybean Harvesting
Soybean HarvestingAgrowon

परिंचे, ता. पुरंदर ः परिसरातील बाजरी व सोयाबीन काढणीची (Millet Soybean Harvesting) कामे अंतिम टप्प्यात आली असून स्थलांतरित मजुरांच्या (Farm Labor) टोळ्या आल्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण झाली आहेत. अतिवृष्टीचा (Heavy Rain Crop Damage) मोठा फटका बाजरी व सोयाबीन पिकाला बसला असून उत्पन्नात (Farmer Income) कमालीची घट आणि मजुरीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक नुकसानीत आला आहे. सोयाबीन काढणीला एकरी ५ हजार तर बाजरी काढणी आणि खुडणीसाठी एकरी ८ हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे.

Soybean Harvesting
Millet's : भरडधान्य पिकांना हवे दीर्घकालीन धोरण

बाजरी काढणीच्या हंगामात बारामती, इंदापूर तालुक्यांतून देऊळवाले व नंदिवाले समाजाच्या अनेक टोळ्या या परिसरात येतात. एकरावर पिकांची पहाणी करून मजुरीची किंमत ठरवली जाते. चालू वर्षी सोयाबीन पीक काढणी व गोळा करून देण्यासाठी पाच हजार रुपये एकरी भाव होता बाजरी कापणी व खुडण्यासाठी एकरी आठ हजार रुपये भाव असल्याचे टोळीचे मुकादम मोतीराम शिंदे यांनी सांगितले.

Soybean Harvesting
Soybean Rate : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा

यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यातून चिखलातून काढावी लागली असल्याचे सांगितले. चालू वर्षी तीस मजुरांची टोळी असून एका दिवसात दोन एकर सोयाबीनची काढणी करून डेपो मारत असल्याचे मजूर सतीश पवार, रामा पवार, अण्णा शिंदे, रामा शिंदे, अशोक शिंदे, विलास शिंदे यांनी सांगितले.

वर्षांतून दोन वेळा परिंचे, हरगुडे, सटलवाडी या परिसरात मजुरीसाठी येत असून जून महिन्यात टोमॅटो तोडणीसाठी या परिसरात येतो. चालू वर्षी शंभर एकर सोयाबीन व सत्तर एकर बाजरी काढणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीमध्ये मजुरीची कामे नसतील तेव्हा आठवडे बाजार व गावच्या यात्रांमध्ये स्टेशनरीची दुकाने लावून उदरनिर्वाह चालवत असून भूमिहीन शेतमजूर असलो तरी घरामध्ये शेळीपालन, गाई पालनासारखे शेतीपूरक व्यवसाय करत असल्याचे राणी शिंदे या मजुरी करणाऱ्या महिलेने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com