Rajma Harvesting : नांदेड जिल्ह्यात राजमा पिकाची काढणी सुरू

नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रब्बीमध्ये हरभरा, गहू, रब्बी ज्वारी यांसारखी पिके घेतली जातात. परंतु मागील काही वर्षांपासून हरभरा पिकाला मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे.
Rajma Harvesting
Rajma HarvestingAgrowon

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रथमच रब्बीमध्ये (Rabi Season) पिकात बदल करून हरभरा (Chana) पिकाऐवजी राजमा पिकाची लागवड (Rajma Cultivation) केली आहे. सगरोळी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बियाण्यांची उपलब्धता झाल्याने यंदा जिल्ह्यात एक हजार एकरावर लागवड झाली आहे. सध्या पिकाची काढणी (Rajma Harvesting) सुरू असल्याची माहिती सगरोळीचे प्रा. कपिल इंगळे यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रब्बीमध्ये हरभरा, गहू, रब्बी ज्वारी यांसारखी पिके घेतली जातात. परंतु मागील काही वर्षांपासून हरभरा पिकाला मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे.

यासाठी या भागातील शेतकरी पीक पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत होते. अशातच शेतकरी करडई सारख्या पिकाकडे वळले आहेत.

देगलूर तसेच धर्माबाद तालुक्यात करडईचे क्षेत्र सात हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे. या पिकासोबतच शेतकऱ्यांनी राजमा पिकाच्या पेरणीकडे कल दिसत होता. यासाठी बिलोली तालुक्यातील संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला.

Rajma Harvesting
Rajma Cultivation : राजमा पीक ठरतेय रब्बीत फायदेशीर पर्याय

बिलोली तालुक्यातील बेळकोणी येथील अमृतालयम शेतकरी उत्पादन कंपनीने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राजमाचे बियाणे उपलब्ध करून दिले. यामुळे जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, नायगाव, मुदखेड, कंधार व धर्माबाद या भागांत रब्बीमध्ये सर्वाधिक एक हजार एकरावर पेरणी झाली आहे.

नवीन पीक असल्याने शेतकऱ्यांत यंदा या पिकाविषयी कुतूहल होते. सध्या या पिकाची काढणी सुरू असल्याने अनेकांच्या नजरा या पिकाच्या उत्पादनाकडे लागल्या आहेत.

Rajma Harvesting
Rajma Market : राजमा ठरतोय फायदेशीर पर्याय !

काही ठिकाणी काढणी केलेल्या शेतकऱ्यांना एकरी चार ते आठ क्विंटल उत्पादन येत असल्याची माहिती मिळाली.

या पिकाला नांदेड, बीड या ठिकाणी बाजार आहे. लागवडीचे पहिले वर्ष असल्याने शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवड तंत्राबाबत अनुभव घेणे महत्त्वाचे असल्याची माहिती प्रा. कपिल इंगळे यांनी दिली.

कंधार तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी व्यंकटराव गणपतराव कदम या शेतकऱ्याचे यंदा दोन एकरांमध्ये राजमाची लागवड केली आहे.

पिकाच्या व्यवस्थापनाविषयी सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. कपिल इंगळे, तसेच सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

यामुळे पीक चांगले आल्याची माहिती व्यंकटराव कदम यांनी दिली. सध्या पिकाची कापणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com