Pomegranate Season : देशात डाळिंबाचा हस्त बहर ३० हजार हेक्टरवर

देशात यंदा डाळिंबाचा हस्त बहर सुमारे ३० हजार हेक्टरवर साधला आहे. यंदाच्या या बहरात नैसर्गिक आपत्तीचे संकट नसल्याने दर्जेदार फळे लागली आहेत.
pomegranate
pomegranateAgrowon

Pomegranate Season सांगली ः देशात यंदा डाळिंबाचा हस्त बहर (Pomegranate Hast Bahar) सुमारे ३० हजार हेक्टरवर साधला आहे. यंदाच्या या बहरात नैसर्गिक आपत्तीचे ()Natural Calamity संकट नसल्याने दर्जेदार फळे लागली आहेत.

फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा किंवा एप्रिलपासून हंगामास (Pomegranate Season) प्रारंभ होईल. या बहरातील डाळिंबाला चांगले दर मिळतील, अशी शक्यता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हस्त बहर सर्वसाधारपणे सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान धरला जातो. गतवर्षी देशात २५ हजार हेक्टवर डाळिंबाचा हस्त बहर शेतकऱ्यांनी धरला होता; मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका डाळिंबाला बसला होता.

त्यामुळे बागांना व्यवस्थित ताण बसला नाही. परिणामी, कळी निघण्यास अडचणी आल्या होत्या. या साऱ्यामुळे डाळिंबाचे नुकसान झाले.

गतवर्षी अतिपाऊस झाल्याने हस्त बहरातील डाळिंबावर तेलगट रोगाचाही प्रादुर्भाव झाल्याने फळ गळ मोठ्या प्रमाणात झाली होती. तरीही त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन करून बागा टिकवल्या होत्या.

वास्तविक, मृग बहरातील डाळिंबाचे सातत्याने नुकसान होत असल्याने हा बहर धरणारे शेतकरी हस्त बहराकडे वळले आहेत. त्यामुळे देशात यंदा पाच हजार हेक्टरने या बहरात क्षेत्र वाढले असून ३० हजार हेक्टरवर पोहोचले आहे.

त्यापैकी २० हजार हेक्टर महाराष्ट्रातील आहे. तर उर्वरित १० हजार हेक्टर क्षेत्र गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या तीन राज्यांत आहे.

pomegranate
Exportable Pomegranate : तडवळे झाले निर्यातक्षम डाळिंबाचे गाव

सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान, हस्त बहर धरण्यासाठी शेतकऱ्यांनी छाटणी केली. छाटणीपासून ते आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती, परतीचा पाऊस फारसा झाला नाही. तसेच डिसेंबरमध्येही मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली नाही.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हस्त बहराला नैसर्गिक संकट आणि पावसाचा फटका बसत होता; मात्र यंदाच्या हंगामात निसर्गानेही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना साथ दिल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

pomegranate
Pomegranate Rate : आवक घटल्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत

सध्या डाळिंबाला पोषक वातावरण आहे. डाळिंबावर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव नाही. शेतकऱ्यांनी दर्जेदार डाळिंब पिकवण्यासाठी नेटके नियोजन केले.

त्यामुळे दर्जेदार फळे लागली असून शंभर ते २५० ग्रॅम वजनाची फळे तयार झाली आहेत. फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा ते एप्रिलपासून या हंगामातील डाळिंब विक्रीस बाजारपेठेत येतील.

यंदा डाळिंबाच्या हस्त बहराला नैसर्गिक संटक, पावसाचा फटका बसला नाही. पोषक वातावरणामुळे दर्जेदार डाळिंब झाले आहे. या हंगामातील डाळिंबालाही चांगले दर मिळतील.

- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com