TOP 5 NEWS -सूर्यफुल तेल टंचाईने जगाची होरपळ?

शिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर सूर्यफुल तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. याचा फटका केवळ भारताला बसतोय असं नाही तर जगातील सर्वंच देश अडचणीत आलेत.
Edible oil
Edible oil agrowon

1. देशाच्या विविध भागांत आलेली उष्ण लाट कमी होत असतानाच राज्यातही कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील वर्धा येथे देशातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. वर्धा, चंद्रपूर, अकोला, ब्रह्मपुरी, तसेच उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे तापमानाचा पारा ४४ अंशांवर आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत.


2. गुजरातमध्ये यंदा हरभरा(Gram) लागवड जवळपास ३४ टक्क्यांनी वाढली होती. तसेच बाजारात आवकही अधिक राहीली. नाफेडच्या खरेदीतही गुजरात अव्वल ठरले. यंदा गुजरातमध्ये ४ लाख ६५ हजार टन हरभरा खरेदीचे उद्दीष्ट होते. मात्र खरेदीची गती पाहता येथील सरकराने उद्दीष्ट वाढवून मागितले. त्यानुसार केंद्राने हरभरा खरेदी ७० लाख टनांनी वाढवून ५ लाख ३६ हजार टनांपर्यंत करण्याची परवानगी दिली. गुजरातमध्ये आत्तापर्यंत ४ लाख ४२ हजार टन हरभरा हमीभावाने खेरदी झाला. तसे पाहिले तर महाराष्ट्रात(Maharashtra) लागवड आणि उत्पादन अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाही खरेदीचे उद्दीष्ट वाढवून मिळणं गरेजच आहे. परंतु त्यासाठी राज्य सरकारने पुढकार घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करावा लागेल.

3. देशात गेल्या हंगामात पाऊस उशीरापर्यंत झाला. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता होती. परिणामी उन्हाळी लागवड वाढली. मात्र वाढलेल्या उष्णतेचा पिकांवर परिणाम होतोय. देशाचा विचार करता उन्हाल्यात मुख्यतः भुईमूग आणि तीळाची लागवड होते. तसेच देशभरात भाजीपाला आणि फळांचेही पिक घेतल जाते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी सोयाबीन (soybean)लागवड वाढवली. मात्र वाढत्या उष्णतेचा गव्हावर परिणाम झाला तसा उन्हाळी पिकांवरही होत असल्याचे जाणकारांनी सांगितले. वाढती उष्णता, गर्मी, उष्ण हवा यामुळे पिकांची स्थिती बिघडत आहे. परिणामी उन्हाळी पिकांची उत्पादकता घटू शकते.

4. इंडोनेशियाने २८ एप्रिलपासून पामतेलाच्या (Palm oil)निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे आयातीवर अवलंबून असलेल्याने देशात दर वाढू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन देशातील वितरक खाद्यतेलाची मोठी खरेदी करत आहेत. इंडोनेशियातून बंदी घालपुर्वी निघालेली जहाजे भारतीय बंदरांवर दाखल होत आहे. तर काही जहाजे मार्गात आहेत. त्यामुळे बाजारात वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी तेल वितरकांनी आक्रमक खरेदी सुरु केली. जाणकारांच्या मते देशातील वितरकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इंडोनेशियाच्या बंदीमुळे पुढील काळात पामतेल मिळणार नाही, या भीतीने त्यांनी खरेदी वाढविली. पामतेलाच्या दरात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असेही जाणकारांनी सांगितले.

Edible oil
अतिरिक्त उसाच्या प्रश्‍नावर भाजप किसान मोर्चा आक्रमक

5. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर सूर्यफुल तेलाचा(Sunflower oil) मोठा तुटवडा निर्माण झाला. आपल्याला माहित आहेच, की सूर्यफुल तेल उत्पादनात युक्रेन प्रथम तर रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र युद्धामुळे दोन्ही देशांतील निर्यात अडचणीत आली. युक्रेनमधील बहुतेक बंदरांवर निर्यातीचे काम ठप्प आहे. तर रशियावर युरोपियन देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफुल तेलाची टंचाई जाणवतेय. याचा फटका केवळ भारताला बसतोय असं नाही तर जगातील सर्वंच देश अडचणीत आलेत. जगभरातील सुपर मार्कट्समध्ये सूर्यफुल तेलाची टंचाई जाणवत आहे. ज्या भागांत सूर्यफुल तेल उपलब्ध असेल तिथे दर विक्रमी पातळीवर पोचले. दक्षिण भारतातही सूर्यफुल तेलाला मोठी मागणी असते मात्र सध्या येथेही सूर्यफुल तेल मिळत नाही. ब्रिटनमध्ये सूर्यफुल तेलाची टंचाई असल्याने ग्राहकांच्या खरेदीवर मर्यादा लावण्यात आल्या. येथे दरही वाढविण्यात आल्याने ग्राहकांची गोची झाली. रशियाने युक्रेनवर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आक्रमण केले होते. त्यापुर्वी येथीन तेल घेऊन निघालेली जहाजे मार्च माहिन्यात त्या त्या देशांत पोचली. त्यामुळे मार्चमध्ये सूर्यफुल तेलाची टंचाई जाणवली नाही. भारतात मार्च महिन्यात २ लाख टन सूर्यफूल तेल आयात झाले. मात्र एप्रिल महिन्यातील आयात १ लाख टनांपेक्षाही कमी राहू शकते. त्यामुळे मे महिन्यात देशात खाद्यतेलाच्या(Edible oil) दरात आणखी सुधारणा होऊ शकते. रशिया-युक्रेन युद्ध थांबल्याशिवाय सूर्यफुलाचा पुरवठा वाढणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com