आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनेतर अनुदान मिळाले

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साडेतीन कोटी रुपयांचे थकलेल्या वेतनेतर अनुदानाचे वाटप नुकतेच करण्यात आले.
Health workers
Health workersAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः कोरोना कालावधीत (Corona) शासनाच्या महसुलातील घट आणि कोरोना उपाययोजनांसाठी शासनाच्या तिजोरीवर पडणारा ताण या कारणांमुळे शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनाशिवाय इतर खर्चांवर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु आता वातावरण निवळल्यामुळे आणि शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साडेतीन कोटी रुपयांचे थकलेल्या वेतनेतर अनुदानाचे वाटप नुकतेच करण्यात आले.  

Health workers
Soybean Rate : सोयाबीनचे दर स्थिर

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती विषयक विविध लाभ, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत विविध लाभ याबाबींची अनेक देयके निधी अभावी प्रलंबित होती. याबाबत सेवानिवृत्त व कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे देयकासाठी निधी उपलब्ध करून घेण्याची मागणी केली होती.

Health workers
Color Cotton Verity : नैसर्गिक रंगीत कापसाचे तीन वाण विकसित

कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्यानंतर प्रभारी प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग डॉ अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाकडे त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार सुमारे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी प्राप्त झाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. .

दोन वर्षांंपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले वेतनेतर अनुदान पाठपुरावा करून प्राप्त झाला आहे. नोव्हेंबर महिनाअखेर सर्व कर्मचाऱ्यांची देयकांची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यांवर जमा होईल.
-डॅा. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com