Maharashtra Politics : शिवसेना 'धनुष्यबाणा'वर २० नोव्हेंबरला सुनावणी

शिवसेनेच्या गोठवलेल्या धनुष्यबान चिन्हावर शुक्रवारी २० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार होती.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon

पुणे : Maharashtra Politics : शिवसेनेच्या (Shivsena) गोठवलेल्या धनुष्यबाण चिन्हावर शुक्रवारी २० नोव्हेंबरला सुनावणी होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) मंगळवारी (ता.१७) सुनावणी दरम्यान सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोग आज अंतिम सुनावणी करेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना निवडणूक आयोगाला आणखी काही वेळ मागितला आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि शिंदे गटाचे वकील महेश जेटमलानी (Mahesh Jetmalani) यांनी युक्तीवाद केला.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये. कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करा. कोर्टाचा निर्णय आधी येऊ द्या, अशी विनंती ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. तसेच शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावाही सिब्बल यांनी केला.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. "बंडखोरीनंतर तयार झालेला शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. तसंच शिवसेनेत फूट पडलेली नाही.

जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वकीलांकडून करण्यात आला.

Maharashtra Politics
CM Eknath Shinde : आदिवासींचा विकास निधी तरतुदीचा दावा खरा आहे का ? | ॲग्रोवन

अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी गोठवलं 'धनुष्यबान'

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी या निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून निवडणुकीसाठी धनुष्यबान चिन्हासाठी दावा करण्यात आला होता. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने काही काळासाठी धनुष्यबान चिन्ह गोठवलं होतं. त्यावर मंगळवारी (ता.१७) केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com