Crop Damage : अतिवृष्टिने पिकांचे मोठे नुकसान तरीही नजर अंदाज पैसेवारी ५८ पैसे

अकोला जिल्ह्यात नुकसानीने उत्पादकता कमी
Crop Damage
Crop DamageAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

अकोला ः या हंगामात जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन (Soybean), कपाशीसह (Cotton) इतर पिकांचे मोठे (Crop Damage) नुकसान झाले आहे. पिकांची उत्पादकता कमी झाली. अशातच आता जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Crop Damage
Crop Damage : जोरदार पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान

या वर्षी हंगामात सुरुवातीपासून सततच्या पावसाने नुकसान होत आले. जून, जुलै, ऑगस्ट व आता सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. बाळापूर व अकोला तालुक्यांत पावसामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. याचा अहवाल शासनाकडे गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अपेक्षित होते. पण अंदाज वेगळे येऊ लागले.

Crop Damage
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान

खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करतो. पैसेवारीचा संबंध दुष्काळाशी असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशाच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज, ऑक्टोबरमध्ये सुधारित व डिसेंबर महिन्यात पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. पैसेवारीच्या आधारावर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवते.

Crop Damage
Soybean Rate : सोयाबीन बाजार कसा राहील?

पैसेवारी ५० टक्क्यांच्या खाली निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांवर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात १०१२ महसुली गावे आहेत. त्यातील ९९० गावे खरीप पिकांची लागवडी योग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५८ पैसे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पैसेवारी व प्रत्यक्ष पिकांची स्थिती विपरीत असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय खरीप पिकांची पैसेवारी
तालुका...गावे...पैसेवारी
अकोला...१८१...६०
अकोट...१८५...५७
तेल्हारा...१०६...४९
बाळापूर...१०३...४७
पातूर...९४...६०
मूर्तिजापूर...१६४...५७
बार्शीटाकळी...१५७...६०
एकूण...९९०...५८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com