Satara APMC Election : सातारा जिल्ह्यात चुरशीने मतदान

जिल्ह्यातील आठ शेती उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच बाजार समितीत चुरशीचे मतदान झाले असून बहुतांश बाजार समितीतीत ९० टक्क्यांच्यावर मतदान झाले आहे.
APMC Election Maharashtra
APMC Election Maharashtra Agrowon

Satara Election Update : जिल्ह्यातील आठ शेती उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच बाजार समितीत चुरशीचे मतदान झाले असून बहुतांश बाजार समितीतीत ९० टक्क्यांच्यावर मतदान झाले आहे. सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यात एकूण नऊ बाजार समित्याच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. यापैकी जावळी शेती बाजार निवडणूक झाली असून रविवारी उर्वरित आठ बाजार समितीचे मतदान रविवार पार पडले.

सर्वच ठिकाणी चुरशीने मतदान झाल्याने ९० टक्केवर मतदान झाले आहे. बहुतांश बाजार समितीत निवडणूक पक्षिय पातळीवर न होता स्थानिक आघाड्या करून निवडणुकीस सामोरे गेले होते.

APMC Election Maharashtra
Ratnagiri APMC Election : रत्नागिरीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे ११ उमेदवार विजयी

जिल्ह्यात सर्वाधिक कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष वेधून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या विरोधात माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे युवा नेते अतुल भोसले यांचे पॅनेल उभे केले आहे. या बाजार सकाळपासून चुरशीने मतदान झाले आहे.

APMC Election Maharashtra
Nagar APMC Election : नगरला नेत्यांनी आपापल्या सत्ता राखल्या

या बाजार जिल्ह्यात सर्वाधिक समितीसाठी ९७.१९ टक्के मतदान झाले आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सत्ता असून या निवडणुकीत आमदार भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनेल विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पॅनेल उभे केले असून त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला आहे.

APMC Election Maharashtra
APMC Election Maharashtra : दुसऱ्या टप्प्यातही चुरशीने मतदान

यामुळे येथे चुरस निर्माण झाली आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत ९३.८६ टक्के मतदान झाले आहे. पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री शभुंराज देसाई यांच्या पॅनेल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सत्यजित पाटणकर यांचे पॅनेल असून या ठिकाणी ९२.९२ टक्के मतदान झाले आहे. कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे यांच्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे यांचे पॅनेल असून या ठिकाणी ९५ टक्के मतदान झाले आहे.

बाजार समिती निहाय मतदान टक्केवारी

सातारा ९३.८६, कऱ्हाड ९७.१९, वाई ९०.५७, खंडाळा ९४.८२, फलटण ९२,पाटण ९२.९२, खटाव ८९.७४, कोरेगाव ९५ टक्के मतदान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com