Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर जोर कायम राहणार

धुवाधार कोसळणाऱ्या मॉन्सूनच्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : धुवाधार कोसळणाऱ्या मॉन्सूनच्या पावसाने (Heavy Monsoon Rain) दाणादाण उडवून दिली आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर (Rain Force Continue On Ghatmatha) कायम राहणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याच्या उत्तर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather Update
Kharif Sowing : पूर्व हवेलीत पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे स्थिरावलेला मॉन्सूनचा आस, महाराष्ट्राच्या मध्य भागातून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्‍चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र या वातावरणीय प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात दमदार पाऊस कोसळत आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Weather Update
Kharif Sowing : कापूस, सोयाबीन, तुरीच्या पेरण्या अंतिमतेकडे

आज (ता. १४) कोकणातील पालघर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातही दमदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

ठळक कमी दाब क्षेत्र कायम

दक्षिण ओडिशा आणि परिसरावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर पासून ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत स्थिरावला आहे.

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

पालघर, नाशिक, पुणे

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com