Weather Update : सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार; किनारपट्टी भागाला झोडपले

किनारपट्टी भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दरम्यान शनिवारी (ता. २४) सकाळपासूनदेखील पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचे वाढत असलेले प्रमाण परिपक्व होत असलेल्या भातपीक उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढविणार आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास मुसळधार (Heavy Rainfall) पाऊस झाला. किनारपट्टी भागाला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दरम्यान शनिवारी (ता. २४) सकाळपासूनदेखील पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचे वाढत असलेले प्रमाण परिपक्व होत असलेल्या भातपीक उत्पादक (Paddy Producers) शेतकऱ्यांची चिंता वाढविणार आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती.

Weather Update
Weather Update : राज्यात पावसाची उघडीप शक्य

त्यानंतर दोन-तीन दिवसांपासून पुन्हा काही भागांत हलक्या सरी पडायला सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत सलग दीड ते दोन तास पाऊस पडत होता. किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक होता.

Weather Update
Hawaman Update : कोणत्या भागातून मॉन्सून परतला ? | ॲग्रोवन

देवगड, वैभववाडी, कणकवलीच्या पूर्वपट्ट्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. याशिवाय कुडाळ, सावंतवाडी आदी तालुक्यांत दमदार पाऊस झाला. किनारपट्टी तालुक्यामध्येदेखील मुसळधार पाऊस झाला. दरम्यान या पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Weather Update
Kokan and Ghat Matha वर पावसाचा Red Alert कायम|Weather Update|Agrowon

दरम्यान, पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंतादेखील वाढत आहे. सुरुवातीला लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे भात परिपक्व होण्याच्या स्थितीत येऊ लागले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत ही पिके कापणीला येणार आहेत.

त्यामुळे पावसाची स्थिती अशीच राहिली तर कापणीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिमी)

देवगड १४५.६

मालवण १४०

सावंतवाडी १२२.८

वेंगुर्ला १११.७

कणकवली १२८

कुडाळ १३३.७

वैभववाडी १३०.२

दोडामार्ग १२३.१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com