Heavy Rain : नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पुन्हा अतिवृष्टी

पश्‍चिम भागातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतील सहा महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.
Nashik Heavy Rain
Nashik Heavy RainAgrowon

नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Dam Catchment Area) मंगळवारी (ता. १६) मुसळधार पावसाने (Heavy Rain Nashik) पुन्हा हजेरी लावली. पश्‍चिम भागातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतील सहा महसूल मंडलांत अतिवृष्टीची (Excessive Rain) नोंद झाली. तर इतरही मंडलांत पावसाचा जोर कायम दिसून आला. धरणांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक (water Inflow In Dam) वाढली आहे. त्यामुळे गोदावरी व दारणा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे.

Nashik Heavy Rain
Nashik Rain News: गोदामाईला महापूर अन् गोदावरी कालवे मात्र कोरडेच

जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात ऑगस्टच्या सुरुवातीला इगतपुरी तालुक्यात पावसाची जोरदार फटकेबाजी सुरू होती. त्यांनतर आता पेठ, त्र्यंबकेश्‍वर व सुरगाणा तालुक्यांत पावसाने पुन्हा सर्व परिसर जलमय केला. पेठ तालुक्यात पेठ महसूल मंडलात सर्वाधिक १२४.८ मिमी इतका पाऊस झाला. जोगमोडी व कोहोर मंडलात पावसाचा जोर राहिला. इगतपुरी ११४.८,घोटी ८९.३ व धारगाव मंडलात ९० मिमी इतकी अतिवृष्टीची नोंद झाली. सुरगाणा तालुक्यातील उंबर ठाणा महसूल मंडलात ७१.५ मिमी इतका पाऊस झाला.

Nashik Heavy Rain
Nashik Rain : पावसाचा जोर कमी; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा जोर असल्याने सोयाबीन, भात या पिकांचे नुकसान होत आहे. भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र सारखा पाऊस सुरू असल्याने फवारणी करता येत नाही. त्यामुळे रोग बळावले असल्याचे बार्डे (ता. कळवण) येथील शेतकरी पंडित वाघ यांनी कळविले.

पावसाचा जोर टिकून असल्याने मंगळवारी (ता.१६) दुपारी ५ वाजता १५०० क्युसेक्स विसर्ग गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला होता. तर बुधवारी (ता.१७) त्यात वाढ करून दुपारी २ वाजता ३,६१८ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. दारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने टप्प्याटप्याने विसर्ग वाढविण्यात आला. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत १०००० क्युसेक्स विसर्ग दारणा नदीपात्रात सोडण्यात आला. तर बुधवारी दुपारी २ वाजता १४,४७४ क्युसेक विसर्ग सुरू होता.

धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

१५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ९० टक्के पाणीसाठा होता. पुढील दोन दिवसांत त्यात २ टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील धरणांचा एकूण संकल्पित पाणीसाठा ६५,६६४ दलघफु इतका आहे. त्यात ६०,५३२ दलघफु इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३६ टक्के अधिक पाणीसाठा आहे. ९ धरणे तुडुंब भरली आहेत. तर ६ धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सध्या २० धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्‍वर बंधाऱ्यात पाण्याचा येवा अधिक आहे. त्यामुळे येथून ३९,१७२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com