Weather Update : सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अलर्ट

अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते, अशावेळी नागरिकांनी सतर्क राहावे.
Weather Update
Weather Update

सोलापूर ः प्रादेशिक हवामान विभागाने (Weather Department) केलेल्या पूर्वसूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात रविवारी (ता.११) जिल्ह्यात अलर्ट जारी (Heavy Rain Alert) केला आहे. काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता (Heavy Rain Forecast With Lightning) असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Weather Update
Nashik Rain : जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा

अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते, अशावेळी नागरिकांनी सतर्क राहावे. आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जसे दरड प्रवण क्षेत्र याठिकाणी आपण राहत असल्यास प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. पूर प्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याबाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी, असेही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

नियंत्रण कक्षाला करा संपर्क

मुसळधार पावसामुळे उध्दभवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर दूरध्वनी क्रमांक ०२१७- २७३१०१२ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdumumbai.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com