Rain Update : कोकणात मुसळधार सुरूच

कोकणात जोरदार पावसाच्या सरीवर सरी येत असल्याने नद्यांना आलेले पूर कायम आहेत. कोकणात अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : अरबी समुद्रावरून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्याने कोकणात मुसळधार पाऊस (Heavy Rain In Konkan) तर घाटमाथा आणि धरणक्षेत्रात पावसाची संततधार (Rainfall) सुरू आहे. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी असल्याचे चित्र आहे. हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावलेल्या भागात खरिपाच्या पिकांना (Kharif Crop) दिलासा मिळणार आहे. धरणांत समाधानकारक पाणीसाठ्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

कोकणात जोरदार पावसाच्या सरीवर सरी येत असल्याने नद्यांना आलेले पूर कायम आहेत. कोकणात अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. अतिवृष्टी झाली असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सिंधुदुर्गात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरूच असल्याचे दिसून आले.

Rain Update
Kharif Sowing : पूर्व हवेलीत पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

मध्य महाराष्ट्रातही घाटमाथ्यावर पावसाचा जोर असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. घाटमाथा वगळता उर्वरित भागात शुक्रवारी (ता. ८) दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी पडत होत्या. धुळे, जळगावमध्ये मध्यम सरी, नाशिकच्या धरणक्षेत्रात संततधार, तर पेठ, सुरगाणा मुसळधार पाऊस झाला. सातारा, पुण्याच्या पश्चिम भागात पाऊस कायम होता. सांगलीत उघडीप, तर सोलापुरात ढगाळ वातावरण होते.

मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात भीज पाऊस तर परभणी, हिंगोलीत रिमझिम पाऊस पडत सुरू होता. उर्वरित मराठवाड्यात हलक्या सरींनी हजेरी लावली. विदर्भात ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे. अकोला येथील निंबा, हातऋण मंडलात जोरदार पाऊस पडला. शुक्रवारी (ता. ८) सकाळपर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

शुक्रवारी (ता.८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

मुंबई शहर : कुलाबा ५३.

पालघर : जव्हार १०९, मोखाडा ८१, पालघर ७३, तलासरी ८९, वसई ५४, विक्रमगड ८२, वाडा १८७,

रायगड : कर्जत १४७, खालापूर ११५, महाड ७४, माणगाव ८७, माथेरान २१०, म्हसळा ६१, मुरूड १३४, पनवेल १२५, पेण ९२, पोलादपूर ९२, रोहा १६३, श्रीवर्धन ६९, सुधागडपाली १०६, तळा ८८, उरण ६०.

रत्नागिरी : चिपळूण १०७, दापोली ७१, गुहागर ४४, जयगड १०९, खेड १०९, लांजा २१४, मंडणगड ११०, राजापूर ९८, रत्नागिरी ५८, संगमेश्वर ६२, वाकवली ८२.

सिंधुदुर्ग : देवगड १२५, दोडामार्ग १०६, कणकवली ८८, कुडाळ १९०, मालवण १७०, मुलदे (कृषी) १७६, रामेश्वर ६५, सावंतवाडी

१६०, वैभववाडी १०९, वेंगुर्ला १८१.

ठाणे : अंबरनाथ ११०, भिवंडी १३०, कल्याण १२७, मुरबाड ९०, शहापूर ६८, उल्हासनगर ७४.

मध्य महाराष्ट्र :

कोल्हापूर : आजरा ३८, गगनबावडा १४०, पन्हाळा ३८, राधानगरी ६२, शाहूवाडी ३७.

नाशिक : हर्सूल ११७, इगतपुरी ११२, ओझरखेडा ९२, पेठ ८१, सुरगाणा ६०, त्र्यंबकेश्वर ५७.

पुणे : लोणावळा १८०, पौड ५०, वडगाव मावळ ५१.

सातारा : जावळीमेढा ३१, महाबळेश्वर १३१.

मराठवाडा :

औरंगाबाद : गंगापूर ५३, खुलताबाद ४०, पैठण ३४.

लातूर : जळकोट ३०,

नांदेड : हादगाव ३०, किनवट ५३, लोहा ५८, माहूर ३४.

विदर्भ :

अकोला : अकोला ३४, बाळापूर ३४.

अमरावती : धामणगाव रेल्वे ३०,

चंद्रपूर : बल्लारपूर १०१, भद्रावती ८२, चंद्रपूर ५६, कोरपना ९२, मूल ८०, राजुरा ३८, वरोरा ५८,

गडचिरोली : भामरागड ९८, चामोर्शी ३१, गडचिरोली ७६, मुलचेरा ४३.

नागपूर : कामठी ५१, कुही ५३, नागपूर ८८.

वर्धा : आर्वी ३०, हिंगणघाट ५२, सेलू ५८, वर्धा ३८.

यवतमाळ : दारव्हा ३१, मारेगाव ७८, पांढरकवडा ४०, राळेगाव ४४, वणी ७८, झारी झामणी ३८.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com