Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरूच नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून शनिवारी (ता. १०) पहाटेपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain Sindhudurg) सुरूच असून शनिवारी (ता. १०) पहाटेपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीतदेखील (Water Level) वाढ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये अडथळा निर्माण झाला.

Rain Update
Rain Update : मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले

जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आतापर्यंत सकाळच्या सत्रात ऊन आणि दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस, असे समीकरण तयार झाले होते; मात्र शनिवारी पहाटेपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागांत जोरदार पाऊस पडत आहे. काही भागांना तर पावसाने चांगलेच झोडपून काढले. देवगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. याशिवाय मालवण तालुक्यातदेखील पावसाची संततधार सुरू आहे.

याशिवाय जिल्ह्याच्या इतर भागांतदेखील पावसाचे प्रमाण वाढले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दुपारनतंर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सध्या भातपीक फुलोरा स्थितीत येत आहे. या कालावधीत अधिक पाऊस झाल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढल्यास शेतीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे.

शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस (मिमी)

देवगड १४०, मालवण १३५.८, सावंतवाडी १२०.७, वेंगुर्ला १०८, कणकवली १२४.५, कुडाळ १३०.३, वैभववाडी १२७.२, दोडामार्ग १२२.१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com