Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर

पावसाचा जोर वाढू लागला असून जिल्ह्यातील मोठ्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

रत्नागिरी : पावसाचा जोर (Rain Force) वाढू लागला असून जिल्ह्यातील मोठ्या नद्यांच्या पाण्याची पातळी (River Water Level) वाढू लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण-सावर्डे येथे पाणी साचले असून केळवली (ता. लांजा) येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. (Latest Rain Update)

Rain Update
Weather Update: जून महिन्यामध्ये ५३ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

जिल्ह्यात सोमवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी २०.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले चार दिवस अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. रविवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे बळीराजा धास्तावला होता. परंतु सोमवारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने दिलासा मिळाला. या पावसामुळे दाभोळे-लांजा मार्गावरील केळवली येथील पुलावर पाणी फार मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे. यामध्ये खासगी वाहने आणि एसटी महामंडळाच्या बसेसदेखील अडकून पडल्या आहेत.

पावसाचा फटका चिपळूणलाही बसला आहे. चिपळूणातील सांस्कृतिक केंद्र ते लोटीस्मा वाचनालय रस्ता, आईस फॅक्टरी समोरील रस्ता, परकार कॉम्प्लेक्स समोरील रस्ता, खेंड जाखमाता मंदिर जवळील रस्ता, मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे कॉलेजजवळील परिसर, कापसाळ येथील परिसरात पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वाहनधारक हे त्रस्त झाले आहेत. पहिल्याच पावसात ही अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. महामार्गावर तुंबलेले पाण्याचा निचरा करण्यासाठी पावले उचलावीत अशी सूचना प्रवाशांकडून केली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com