Monsoon Rain: विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

राज्यात पावसाचा जोर ओसरलाय. आज राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला.
Rain Update
Rain UpdateAgrowon

राज्यात पावसाचा जोर (Heavy Rainfall)ओसरलाय. आज राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर बहुतेक मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. मात्र सर्वत्र पावसाचा जोर कमीच होता. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert)जारी केलाय. कोकणात काही मंडळांमध्ये जोरदार सरी झाल्या. पालघर (Paalghar)जिल्ह्यातील वसई, आणि तलासरी येथे मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. तर रायगड जिल्ह्यातील मानगाव मंडळात ८२ मिलिमीटर आणि तळा येथे ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर महाड, माथेरान आणि रोहा येथे मध्यम सरी पडल्या. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार सरी पडल्या.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा येथे ५७ मिलिमीटर पाऊस झाला. तर इतर मंडळांमध्ये पावसाचो जोर कमी होता. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. एरंडोल येथे ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.नंदूरबार येथे १४८ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही सर्वदूर हलक्या ते मध्यम सरी झाल्या. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे ९२ मिलिमीटर पाऊस झाला. तर वेल्हा, वडगाव मावळ, मुळशी या मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. सातारा येथील महाबळेश्वर मंडळात १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जावळी मेढा येथे ४४ मिलिमीटर पाऊस पडला. नगर, धुळे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

Rain Update
Monsoon Rain: राज्यात पावसाने दाणादाण

मराठवाड्यातही ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र पावसाचा जोर कमीच होता. विदर्भात अनेक भागांत हलक्या सरी पडल्या. अकोला, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यातील बहुतांशी मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मात्र पावसाची उघडीप होती. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. गोंदीया जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. तर नागपूर जिल्ह्यात बहुतांशी मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडल्या. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही जवळपास सर्वच मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली.

Rain Update
Farmer Loan : शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी करण्याचा वेगळा मार्ग

हवामान हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतांश मंडळात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात तसचं संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com