विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा अंदाज

पूर्वमध्य अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रासह, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा अंदाज
Rains In Marathawada, VidarbhaAgrowon

पुणे : मॉन्सूनची वाटचाल, पूर्वमोसमी पाऊस यामुळे राज्याच्या तापमानात घट झाली आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. आज (ता. १४) विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

हरियाणापासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरात किनाऱ्यापासून उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रासह, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

Rains In Marathawada, Vidarbha
भारत गहू निर्यातबंदी आणखी शिथिल करण्याची आशा : आयएमएफ

निम्म्या महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या सर्वच भागात कमाल तापमान चाळीशीच्या खाली आले आहे.

सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.९, धुळे ३८.०, कोल्हापूर २९.६, महाबळेश्वर २२.३, नाशिक ३२.३, निफाड ३६.८, सांगली ३२.६, सातारा ३१.२, सोलापूर ३६.२, सांताक्रूझ ३२.९, डहाणू ३४.१, रत्नागिरी ३१.१, औरंगाबाद ३४.४, परभणी ३२.२, अकोला ३५.०, अमरावती ३६.०, बुलडाणा ३७.४, ब्रह्मपुरी ३९.४, चंद्रपूर ३८.०, गोंदिया ३६.६, नागपूर ३६.९, वर्धा ३८.०, यवतमाळ ३६.०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com