Weather Update : राज्यात पुन्हा मुसळधारेचा इशारा

राज्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र शनिवारी काही भागांत जोरदार पाऊस झाला.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

पुणेः राज्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाने (Rain Update) उघडीप दिली होती. मात्र शनिवारी काही भागांत जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवडा आणि विदर्भातील काही मंडळांत मुसळधार पाऊस (Heavy Rain Maharashtra) झाला. हवामान विभागाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत पुणे, पालघर, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Rain Yellow Alert) दिलाय.

कोकणातील काही भागांत पावसाने शनिवारी हजेरी लावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलक्या सरी झाल्या. पुणे जिल्ह्यातही शनिवारी सकाळी काही भागांत पाऊस झाली. दुपारीही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला. तर सांगली जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातही ढगाळ वातावरण होते. सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात काही ठिकाणी जोरदार सरी झाल्या. खानदेशातही बऱ्याच ठिकाणी पावसाची भुरभुर सुरु होती. मात्र जोरदार पाऊस झाला नाही.

Weather Updates
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

मराठवाड्यातील काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने सुरु केली होती. हा पाऊस किनवट, मुखेड, माहूर, देगलूर व हिमायतनगर या तालुक्यांत जोरदार झाला. किनवट तालुक्यातील तीन मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. तर परभणी आणि हिंगील जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर औरंगाबाद, जालाना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला.

Weather Updates
Soybean : सोयाबीनच्या पेरणी क्षेत्राने ओलांडला सरासरी क्षेत्राचा टप्पा

विदर्भातही शनिवारी बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात पावासाचा जोर अधिक होता. मात्र अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुलनेने पावासाचं प्रमाण कमी होतं. काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या. तर वाशीम आणि अकोला जिल्ह्यातही काही भगांत पावसाने हजेरी लावली.

भारतीय हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली. तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तसेच विजांसह अधूनमधून पावसाच्या सरीही कोसळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत पुणे, पालघर, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com