Rain Forecast : मराठवाडा, विदर्भात पाऊस उघडीप देणार

उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. राज्यात ठिकठिकाणी पाऊस हजेरी लावतोय.
Rain Prediction
Rain PredictionAgrowon

राज्यात ठिकठिकाणी पाऊस हजेरी (Heavy Rainfall) लावतोय. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस नव्हता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस होता. उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं (Weather Departmnet) काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जारी केलाय.

Rain Prediction
शेतकरी नियोजन पीक ः केळी

कोकणातील बहुतांशी मंडळात हलक्या ते मध्यम सरी झाल्या. पालघर जिल्ह्यातील मोखेडा, जव्हार, पालघर आणि तलासरी या मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात कर्जत आणि पनवेल येथे मध्यम सरी पडल्या तर माथेरान येथे ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुतांशी मंडळात पावसाचा शिडकावा झाला.

Rain Prediction
Custerd Apple : सीताफळातील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक नियंत्रण

मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. नगर, धुळे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती होती. कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा येथे ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर इतर मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. जळगाव जिल्ह्यातील अनेक मंडळांत हलका पाऊस पडला. नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ८९ मिलिमीटर पाऊस झाला, मात्र इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमी होता. पुणे जिल्ह्यातही वेल्हा येथे ५९ तर लोणावळा येथे ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वगळता पाऊस नव्हता.

मराठवाड्यात आज पावसाची उघडीप होती. तुरळक ठिकाणी हलक्या सरी झाल्या मात्र जोर नव्हता. विदर्भात मात्र ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली. अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. तर अमरावतीत काही मंडळांमध्ये हलक्या सरींसह चांदूरबाजार येथे ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भंडारा, गोंदीया आणि बुलडाणा जिल्ह्यात काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. नागपूर जिल्ह्यात सर्वच मंडळांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात पावसाची उघडीप होती.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत पुणे, नाशिक, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com