Weather Update : काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात काही भागांत पावसाचं प्रमाण काहीसं वाढलं. मात्र अनेक भागांत पावसाची उघडीप कायम होती. हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यात काही भागांत पावसाचं (Rain) प्रमाण काहीसं वाढलं. मात्र अनेक भागांत पावसाची उघडीप कायम होती. हवामान विभागाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा (Heavy rain Forecast) दिलाय. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) आणि येलो अलर्ट जारी केलाय.

Rain Update
Cotton : कापूस बाजारात अचानक तेजी का आली ?

कोकणात पावसाचं प्रमाण वाढलंय. पालघर जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमीच होता. काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. रायगड जिल्ह्यात मात्र बहुतके मंडळांमध्ये पाऊस झाला. ताळा, पोलादपूर, माथेरान आणि मानगाव मंडळामध्ये मध्यम पाऊस पडला. तर रत्नागिरी जिल्ह्यात काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण कमी होतं. काही मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला.

मध्य महाराष्ट्रातील नगर, धुळे, नंदूरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप कायम होती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पुणे जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र जोरदार पाऊस नव्हता. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही पाऊस नव्हता।

Rain Update
Tur Rate : तुरीचे दर कितीने नरमले ?

मराठवाड्यातही बहुतेक ठिकाणी पावसाची उघडीप कायम होती. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद आणि सोयगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडल्या. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ आणि वडवणी या मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. तर जालना, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती कायम होती. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस नव्हता. मात्र गोंदीया जिल्ह्यातील तिरोडा येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातही पावसाची उघडीप कायम होती.

दरम्यान हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला. उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सातारा तर मराठवाड्यातील जालना, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com